मुंबई : हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेचा दिवस इतका शुभ मानला जातो की या दिवशी नवीन काम सुरु (Akshaya Tritiya) करण्यासाठी पंचांग पहाण्याची गरज नसते. तृतीयेला कोणतेही शुभ कार्य कधीही केले जाऊ शकते. हा दिवस लग्नासाठीही खूप शुभ मानला जातो. देवोत्थान एकादशी प्रमाणे या दिवशी अबूझ शुभ मुहूर्त असतो. या दिवशी लग्नासाठी कोणत्याही पंडितच्या सल्ल्याची गरज नाही (Why Akshaya Tritiya Is The Best Shubh Muhurat For Marriage).
लग्नसुद्धा एक शुभ कार्य आहे म्हणूनच, बरेच लोक विशेषत: अक्षय्य तृतीयेच्या तिथीला आपल्या मुलांचे लग्न करण्याची प्रतीक्षा करतात. अनेकांची अशी मान्यता आहे की या दिवशी लग्न लावल्याने मुलांचे वैवाहिक जीवन आनंद आणि समृद्धीने भरलेले असेल. याशिवाय, लग्नाच्या वेळी कन्या दान एक महत्वाचा विधी आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कन्या दान केल्यास त्याचे पुण्य अनेक पटीने वाढते. अक्षय्य तृतीयेचा दिवस लग्नासाठी इतका शुभ का मानला जातो ते जाणून घेऊया.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूचा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला. या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरु झाले असा सर्व अभ्यासकांची मान्यता आहे. द्वापार युगाचा शेवट आणि कलियुगाचा प्रारंभ या दिवसापासूनदेखील मानला जातो. अक्षय तृतीया याला युगादी तिथी म्हणून देखील ओळखले जाते, कारण ते युगांची सुरुवात आणि शेवटची तारीख आहे.
पौराणिक कथांनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी महाभारतची लढाई संपली होती. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिरांना सांगितले की, या दिवशी जे काही सर्जनशील किंवा सांसारिक कार्य केले जातील, त्याचं पुण्य मिळेल आणि त्यामध्ये कोणतीही नवीन कामे किंवा व्यवसाय प्रसिद्धी आणि कीर्ती प्राप्त करतील.
अक्षय्य तृतीयेबद्दल अशीही एक मान्यता आहे की, भगवान कृष्णाचे परम मित्र सुदामा या दिवशी द्वारका येथे पोहोचले होते आणि त्यांनी देवाची भेट घेतली होती आणि त्यांना काही तांदुळ अर्पण केले होते. ज्याला प्रेमभावनेने ग्रहण केल्यानंतर श्रीकृष्णाने त्यांचे दारिद्र्य दूर केले आणि त्याच्या झोपडीला राजवाडा आणि गावाला सुदामा शहर बनवले. त्या दिवसापासून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दानाचे महत्त्व वाढले.
मान्यता आहे की, अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर महर्षि वेद व्यासजी यांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये गीता देखील आहे. या दिवशी गीतेचा 18 वा अध्यायाचे पठण करणे शुभ मानले जाते.
Akshaya Tritiya 2021 | आज अक्षय्य तृतीया, जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त, पौराणिक कथा आणि इतर माहितीhttps://t.co/a81XWUcr81#AkshayaTritiya2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2021
Why Akshaya Tritiya Is The Best Shubh Muhurat For Marriage
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Akshaya Tritiya 2021 | जाणून घ्या अक्षय्य तृतीयेचं महत्व आणि सोने खरेदीचा शुभ मुहूर्त
Akshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला दान का करावे?, जाणून घ्या ही पौराणिक कथा
Akshaya Tritiya 2021 : अक्षय्य तृतीयेला ‘या’ शुभ गोष्टी खरेदी करा, देवी लक्ष्मी प्रसन्न होईल