हिंदू धर्मामध्ये पूजा, प्रार्थनेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही जेव्हा देवाची पूजा करतात ती पूजा पूर्ण होऊन आपल्याला त्या देवतेचा आर्शीवाद मिळण्यासाठी आपण केलेल्या पूजेचं फळ आपल्याला मिळण्यासाठी आपलं इच्छित मनोव्रत पूर्ण होण्यासाठी आपण पूजेदरम्यान विविध विधी करत असतो. त्या प्रत्येक विधीमागे एक अर्थ असतो. तुम्ही जेव्हा जेव्हा मंदिरामध्ये जाता तेव्हा तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की तिथे मंदिरातील देवतेसमोर घंटा बांधलेली असते. तुम्ही ती आधी वाजवता आणि नंतर त्या देवतेचं दर्शन घेता. आपल्या मनातील इच्छा व्यक्त करता. मात्र तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की प्रत्येक मंदिरात दिसणारी ही घंटा देवासमोर का बांधाली जाते? आणि त्या देवतेच्या पाया पडण्यापूर्वी आपण ती घंटा का वाजवतो? आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
मंदिरात घंटा का बांधली जाते?
मंदिरात घंटा का बांधली जाते, या मागे धार्मिक कारणांसोबतच काही वैज्ञानिक कारणं देखील आहेत. धार्मिक मान्यतेनुसार तुम्ही जेव्हा देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातात तेव्हा देवाचं दर्शन घेण्यापूर्वी मंदिरातील घंटा आधी वाजवता आणि नंतर मूर्तीच्या पाया पडता. असं केल्यामुळे त्या मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण होतं. देवाच्या पूजेचं शुभ फळ तुम्हाला मिळतं. देवाचं दर्शन घेण्यापूर्वी तुम्ही जर घंटा वाजवला, तर तुम्ही तुमच्या आयुष्यात जी काही पाप केली आहेत ती देखील नष्ट होतात अशी धार्मिक मान्यता आहे.
दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरातील घंटा वाजावता, तेव्हा त्या घंटानादातून विशिष्ट प्रकारचा ध्वनी बाहेर पडतो. या ध्वनीमुळे आजूबाजुच्या परिसरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक उर्जा निर्माण होते. तुमचं मन प्रसन्न होतं. जर तुमच्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार येत असतील तर देवळात होणाऱ्या घंटानादाचा आवाज दिवसातून एकदा तरी ऐका असा सल्ला देखील काही जण देतात, त्यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होऊन तुमच मन सकारात्मक होण्यास मदत होते.
(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)