विवाहित महिला भांगेमध्ये कुंकू का भरतात? 99 टक्के लोकांना माहीत नाही खरं कारण

| Updated on: Nov 16, 2024 | 6:40 PM

भारतीय संस्कृतीमध्ये खास करून हिंदू धर्मात लग्न झालेल्या स्त्रीया आपल्या भांगेमध्ये कुंकू भरतात. त्यामागे नेमकं काय कारण आहे? ते जाणून घेऊयात

विवाहित महिला भांगेमध्ये कुंकू का भरतात? 99 टक्के लोकांना माहीत नाही खरं कारण
Follow us on

भारतीय संस्कृतीमध्ये खास करून हिंदू धर्मात लग्न झालेल्या स्त्रीया आपल्या भांगेमध्ये कुंकू भरतात. लग्नाच्यावेळी सर्वप्रथम वर आपल्या होणाऱ्या पत्नीच्या भांगेमध्ये हाताच्या अंगठ्यानं कुंकू भरतो. असं मानलं जात की पत्नीने भांगेमध्ये कुंकू लावलं तर तिच्या पतीचं आयुष्य वाढतं.सोबतच जर महिलेच्या भांगेमध्ये कुंकू असेल तर असं म्हटलं जातं की या महिलेचं लग्न झालं आहे. भांगेमध्ये कुंकू भरण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. जोपर्यंत एखाद्या महिलेचा पती जीवंत आहे, तोपर्यंत ती महिला आपल्या भांगेमध्ये कुंकू भरते. पतीच निधन झाल्यानंतर ती महिला भांगेमध्ये कुंकू भरत नाही. भांगेमध्ये कुंकू भरण्याचं केवळ धार्मिक कारणच नाही तर काही वैज्ञानिक कारणं देखील आहेत. जाणून घेऊयात विवाहित महिला भांगेमध्ये कुंकू का भरतात?

शास्त्र काय सांगतं?

शास्त्रानुसार लग्नाच्या दिवशी पती आपल्या पत्नीची भांग कुंकवानं स्व:च्या हातानं भरतो. त्यानंतर ती महिला जोपर्यंत तिचा पती जीवंत आहे, तोपर्यंत आपल्या भांगेमध्ये कुंकू भरते. पौराणिक कथांनुसार जी महिला आपल्या भांगेमध्ये कुंकू भरते तिच्या पतीचं वाईट शक्तीपासून माता पार्वती रक्षण करते. तसेच त्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होते.

महिला आपल्या भांगेमध्ये कुंकू भरते. कुंकू हे लाल असंत. शास्त्रामध्ये लाल रंगाला शुभ मानलं जातं. हे तुमच्या सुखी वैवाहिक जीवनाचं प्रतीक आहे. असं मानलं जात की भांगेमध्ये भरण्यात आलेलं कुंकू महिलांमधील सकारात्मकता वाढवते. नकारात्मक शक्तिंचा नाश होतो. सोबतच यामुळे महिलांचे आरोग्याविषयीक अनेक समस्या दूर होतात. वाईट शक्तीपासून महिलांचं संरक्षण होतं.

काय आहे वैज्ञानिक कारण?

महिला आपल्या भांगेमध्ये कुंकू भरतात याचं धार्मिकच नाही तर वैज्ञानिक कारण देखील आहे. विज्ञानानुसार कुंकू हे हळद आणि लिंबापासून बनते. कुंकवाला महिला आपल्या भांगेमध्ये भरतात. त्यामुळे महिलांमधील तणाव दूर होण्यास मदत होते.कुंकू महिलांना अॅक्टिव ठेवण्यास मदत करते. तसेच कुंकवामुळे ब्लड प्रेशर देखील कट्रोल होण्यास मदत होते.