मुंबई : भारतीय संस्कृतीत विवाहाला विशेष स्थान देण्यात आले आहे. भारतात, विवाह हा एक सामाजिक परंपरा आहे ज्यामध्ये दोन लोकं वेगवेगळ्या परंपरा आणि विधींचे पालन करून एकत्र होतात. या विवाह विधींपैकी एक म्हणजे मेहंदी (Mehandi Importace in Marriage) ज्यामध्ये ती वधू आणि वरांच्या हातावर आणि पायावर लावली जाते. लग्नात मेहंदी लावण्याचा विधी बहुतेक राज्यांमध्ये प्रचलित आहे. लग्नाच्या काही दिवस आधी हा विधी केला जातो. यामध्ये वधूच्या हातावर आणि पायावर मेंदी लावून सुंदर आणि आकर्षक डिजाईन बनवल्या जातात. हा विधी वधू आणि वरच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांद्वारे केला जातो. मात्र लग्नात मेहेंदीला इतके महत्त्व का आहे? यामागचे कारण अनेकांना नाही माहिती.
लग्नात मेहंदी लावण्याच्या विधीला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. याशिवाय मेहंदीला सौंदर्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. या विधीमुळे वधूचे तेज वाढते आणि तिचे सौंदर्य वाढते. हिंदू धर्मात 16 अलंकारांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये मेहंदी देखील समाविष्ट आहे. मेहंदी वधूचे सौंदर्य वाढवते. मेहंदी हे प्रेमाचे लक्षण मानले जाते, त्याच्या रंगाबद्दल असे म्हटले जाते की मेहंदीचा रंग जितका उजळेल किंवा मेहेंदी जितकी रंगेल तितके जास्त वधूच्या जोडीदाराचे तिच्यावर प्रेम असते. मेहंदीचा चमकदार रंग वधू आणि वरांसाठी खूप भाग्यवान असतो.
असे मानले जाते की लग्नाच्या वेळी वधू आणि वर दोघांनाही खूप चिंता वाटते. मेहंदीची प्रकृती थंड असते त्यामुळे ती शरीराचे तापमान राखून शरीराला थंडावा देते. त्यामुळे वधू-वरांना मेहंदी लावली जाते. इतकेच नाही तर प्राचीन काळी मेंदीचा उपयोग आयुर्वेदिक औषध म्हणूनही केला जात असे. लग्नात मेहेंदी लावण्याची पद्धत हिंदू, मुस्लिम आणि इतर अनेक धर्मांमध्ये आहे. मेहेंदी ही शुभ प्रतिक माणल्या जात असल्याने ती लग्नात लावली जाते.