मुंबई : हिंदू धर्मात पूजेच्या वेळी घंटा (Ghanta Importance in Puja) वाजवण्याला विशेष महत्त्व आहे. मग ती मंदिराची घंटा असो किंवा घरातील पुजेची घंटा असो. असे मानले जाते की घंटा वाजवल्याने देव तुमची प्रार्थना ऐकतो. मंदिराच्या घंटाचा आवाज मनात शांतता आणि पवित्रतेची भावना निर्माण करतो. याशिवाय घंटा वाजवण्यालाही शास्त्रीय महत्त्व आहे. पण आपण घंटा का वाजवतो याचा विचार केला आहे का? चला तर मग आज आम्ही तुम्हाला घंटा वाजवण्याचे वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व जाणून घेऊया.
घंटा वाजवण्यामागे धार्मिक कारणाव्यतिरिक्त, त्याचा आपल्या जीवनावर वैज्ञानिक प्रभाव देखील आहे. शास्त्रज्ञ म्हणतात की घंटा वाजवल्याने आजूबाजूच्या वातावरणात कंपन निर्माण होते. घंटाच्या आवाजाने हानिकारक विषाणू, जीवाणू आणि सूक्ष्म कण नष्ट होतात. तुमच्या सभोवतालचे वातावरण शुद्ध होते. याशिवाय बरेच लोक त्यांच्या दारावर आणि खिडक्यांवर विंड चाइम लावतात. हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे काम करते. यामुळे घरात समृद्धी येते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)