मुंबई : अनेकदा आपण घरात, देवळात किंवा देवाच्या आरती-कीर्तनात असलो तर नक्कीच टाळ्या वाजवतात. भजन-कीर्तनासाठी कोणतेही वाद्य वापरले की आपले हात टाळी वाजवायला (Clapping) नक्कीच वर येतात. पण भजन कीर्तनात टाळी का वाजवली जाते माहीत आहे का? टाळी वाजवण्याची परंपरा कशी सुरू झाली? आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. टाळ्या वाजवण्याचे शास्त्रीय कारण आणि धार्मिक दोन्ही फायदे आहेत. टाळ्या वाजवण्यामागेही एक पौराणिक कथा दडलेली आहे. त्याबद्दलही जाणून घेऊया.
एका पौराणिक कथेनुसार, टाळी वाजवण्याची प्रथा भगवान विष्णूच्या भक्त प्रल्हादने सुरू केली होती. वास्तविक प्रल्हादचे वडील हिरण्यकश्यप यांना विष्णूजींची भक्ती आवडली नाही. त्यासाठी त्यांनी अनेक उपाय केले, पण प्रल्हादवर या सर्वांचा काहीही परिणाम झाला नाही. शेवटी हिरण्यकश्यपने वाद्याचा नाश केला. असे केल्याने प्रल्हाद भगवान विष्णूची पूजा करू शकणार नाही असे हिरण्यकश्यपला वाटले. पण असे झाले नाही, प्रल्हादने हार मानली नाही. श्री हरी विष्णूच्या स्तोत्रांना ताल देण्यासाठी त्यांनी आपले दोन्ही हात वाजवायला सुरुवात केली. त्यामुळे एक ताल तयार झाला. त्यामुळे याला टाळी हे नाव पडले.
तेव्हापासून प्रत्येक भजन-कीर्तनात टाळ्या वाजू लागल्या. असे मानले जाते की टाळी वाजवून देवाचे लक्ष वेधले जाते. तसेच भजन-कीर्तन किंवा आरतीच्या वेळी टाळ्या वाजवल्याने पापांचा नाश होतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते अशीही मान्यता आहे.
दुसरीकडे, टाळ्या वाजवण्याच्या शास्त्रीय कारणाविषयी बोलताना, टाळ्या वाजवल्याने तळहातांच्या एक्यूप्रेशर पॉईंटवर दबाव येतो. यासोबतच हृदय आणि फुफ्फुसाच्या आजारातही याचा फायदा होतो. टाळ्या वाजवल्याने रक्तदाबही बरोबर राहतो. टाळ्या वाजवणे हा देखील एक प्रकारचा योग मानला जातो. असे केल्याने अनेक प्रकारचे आजार बरे होऊ शकतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)