देवाजवळ दिवा का लावला जातो? तुम्हालाही माहिती नसणार खरं कारण

| Updated on: Dec 09, 2024 | 6:47 PM

हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी दिवे लावण्याला सर्वाधिक महत्त्व आहे. दिवे लावण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. धार्मिक दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास दिव्यांना अत्यंत महत्त्व आहे.

देवाजवळ दिवा का लावला जातो? तुम्हालाही माहिती नसणार खरं कारण
Follow us on

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरात सकाळ संध्याकाळ पूजा केली जाते. पूजा करताना देवाजवळ दिवा लावला जातो. हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीला मोठ्या प्रमाणात दिवे लावले जातात. वेदांमध्ये अग्नीला देवता मानले आहे. असे म्हटले जाते की पूजेच्या वेळी दिव्याचा प्रकाश अंधार दूर करतो जे अज्ञानाचे प्रतीक आहे. तसेच ज्ञानाचा प्रकाश मनातील अज्ञान दूर करतो. दिव्याचा प्रकाश देवाच्या प्रकाशाचे प्रतीक आहे. दिवा आपल्याला देवाच्या अस्तित्वाची आणि त्याच्या शक्तीची आठवण करून देतो. धार्मिक विधी, पूजा करताना दिवे लावण्याला विशेष महत्त्व आहे. शुभकार्यात दिवा लावणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ऋग्वेद काळापासून ते कलियुगापर्यंत दिवे लावण्याची परंपरा अविरत चालू आहे.

पूजा करताना दिवा लावल्याने वातावरणामधील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दिवे लावल्यामुळे देव प्रसन्न होतात. दिव्यांचा प्रकाश देवांना आकर्षित करतो असे मानले जाते. दिवा लावणे हे शुभाचे प्रतीक आहे. दिवे हे नवीन सुरुवात आणि उज्वल भविष्य दर्शवतात.

दिव्याचे धार्मिक महत्त्व

ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणजे दिवा आहे. शास्त्रांमध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला आहे. अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा लावला जातो. दिव्यामूळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरतो. दररोज पूजा करताना दिवा लावला जातो. तुपाचा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते. त्यासोबतच ज्या घरात नियमितपणे दिवे लावले जातात त्या घरामध्ये लक्ष्मी देवी कायम राहते. तूप हे पंचामृत मानले जाते. कोणत्याही सात्विक पूजेचे पूर्ण फळ मिळण्यासाठी तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. तुपाचा दिवा लावल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. तर तामसिक म्हणजेच तांत्रिक पूजेच्या यशासाठी तेलाचा दिवा वापरला जातो.

विविध धर्मात दिव्याचे महत्त्व

हिंदू धर्मामध्ये सर्वच पूजेत दिवे लावले जातात. हिंदू धर्मामध्ये दिव्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे. बौद्ध धर्मामध्ये दिवे लावणे प्रचलित आहे. हे बुद्धाच्या ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. शीख धर्मात गुरुद्वारांमध्ये दिवे लावले जातात. जे ज्ञान आणि सत्याचे प्रतीक आहे.

पंच तत्वांचे प्रतीक मातीचा दिवा

मातीचे दिवे पंचतत्वांपासून तयार केले जातात. खरंतर दिवा तयार करण्यासाठी माती पाण्यात वितळून तयार केली जाते. जे जमीन आणि पाण्याच्या घटकाचे प्रतीक मानले गेले आहे. दिवा हा धुळ आणि वाऱ्याने सुकवला जातो. जो आकाश आणि वायु तत्वाचे प्रतीक आहे. शेवटी हा दिवा आगीत गरम करून तयार केला जातो. अशा पद्धतीने पंचतत्वांनी मिळून दिवा तयार केला जातो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)