पुजेत पंचांमृताला का आहे महत्त्व? अशा प्रकारे तयार करा पंचामृत

| Updated on: Jun 15, 2023 | 12:39 PM

काही ग्रंथांमध्ये पंचामृताचे महत्त्व सांगण्यात आले आहेत, की जो व्यक्ती भक्तीभावाने पंचामृत ग्रहण करतो त्याला जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि समृद्धी प्राप्त होते.

पुजेत पंचांमृताला का आहे महत्त्व? अशा प्रकारे तयार करा पंचामृत
पंचामृत
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : पंचामृत (Panchamrit in Puja)  म्हणजे पाच अमृत म्हणजे पाच पवित्र गोष्टींनी बनलेले. हे मिश्रण म्हणजे दूध, दही, तूप, साखर आणि मध मिसळून बनवलेले पेय, जे देवतांना प्रिय आहे. प्रसादाच्या रूपातही याला खूप महत्त्व आहे. याने देवाचा अभिषेक करण्याला विशेष महत्त्व आहे. याशिवाय हे प्यायल्याने माणसाच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होतात, तसेच त्याचे आरोग्यदायी फायदेदेखील आहे. काही ग्रंथांमध्ये पंचामृताचे महत्त्व सांगण्यात आले आहेत, की जो व्यक्ती भक्तीभावाने पंचामृत ग्रहण करतो त्याला जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि समृद्धी प्राप्त होते. भगवंताला अर्पण केलेले पंचामृत प्यायल्याने मनुष्य जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्षप्राप्ती करतो अशीही धार्मीक मान्यता आहे.

आयुर्वेदात पंचामृताचे महत्त्व

आयुर्वेदात दूध, दही, तूप, मध आणि साखर यांच्या मिश्रणाला पंचामृत म्हणतात. हे मिश्रण प्यायल्याने शरीरातील 7 धातू वाढतात. म्हणजेच रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र यांची वाढ करून शरीर बलवान होते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि संसर्गजन्य आजारही टाळता येतात. पंचामृतामध्ये सर्व वस्तूंचे विशेष प्रमाण घेतले जाते. ते बनवताना तूप आणि मधाची विशेष काळजी घेतली जाते. कारण त्यांचे समान प्रमाण विष बनते.

हे सुद्धा वाचा

पंचामृताचे धार्मिक महत्त्व

  • दूध – हा पंचामृताचा पहिला भाग आहे. ते शुभाचे प्रतिक आहे म्हणजेच आपले जीवन दुधासारखे शुद्ध असावे.
  • दही – त्याचा गुण म्हणजे तो इतरांना स्वतःसारखा बनवतो. दही अर्पण करण्याचा अर्थ असा आहे की प्रथम आपण स्वच्छ राहून सद्गुण अंगीकारून इतरांना आपल्यासारखे बनवावे.
  • तूप – हे गुळगुळीत आणि आपुलकीचे म्हणजेच प्रेमाचे प्रतीक आहे. सर्वांशी प्रेमाचे संबंध असले पाहिजेत, ही भावना आहे.
  • मध – यामुळे शक्तीही मिळते. शरीर आणि मनाने बलवान माणूसच यश मिळवू शकतो.
  • साखर – तिचा गुण म्हणजे गोडपणा, साखर अर्पण करणे म्हणजे जीवनात गोडवा वाढवणे.

आयुर्वेदिक महत्त्व

  • पंचामृत प्यायल्याने शरीरात कॅल्शियमची कमतरता होत नाही.
  • पंचामृतात असलेल्या पाच गोष्टींमुळे शरीराला कमी वेळात जास्त ऊर्जा मिळते.पंचामृत सेवन शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे.
  • त्यात तुळशीचे पान टाकून त्याचे नियमित सेवन केल्यास कोणत्याही प्रकारचे आजार होत नाहीत.
  • पंचामृत सेवनाने संसर्गजन्य रोग दूर राहतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
  • त्यामुळे चेहऱ्याचा रंग सुधारतो आणि लालसरपणा राहतो.

पंचामृताशी संबंधित या गोष्टी लक्षात ठेवा

  • पंचामृत त्याच दिवशी संपवा. दुसऱ्या दिवसासाठी ठेवू नका.
  • पंचामृत अल्प प्रमाणातच घ्यावे. प्रसाद स्वरूपात 1 किंवा 1 चमचे.
  • पंचामृत नेहमी उजव्या हाताने घ्या, या दरम्यान तुमचा डावा हात उजव्या हाताला लागून ठेवा.
  • पंचामृत घेण्यापूर्वी डोक्याला लावावे, नंतर घ्यावे. यानंतर डोक्यावर हात पुसू नये.
  • पंचामृत नेहमी चांदीच्या भांड्यातूनच द्यावे. चांदीमध्ये ठेवलेले पंचामृत इतके शुद्ध होते की त्यामुळे अनेक रोग दूर होतात. त्यात आढळणारी
  • तुळशीची पाने त्याची गुणवत्ता वाढवतात. अशा पंचामृत सेवनाने बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)