अयोध्या : काल अयोध्येतील रामलाला पाहून कोट्यावधी लोकांचे डोळे आनंदाने पाणावले. श्री रामाचे विलोभनीय रूप प्रत्त्येकाने आपल्या डोळअयात साठवले. काल रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर (Ramlala Pranpratitha) 500 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. या दिवशी म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पूर्ण विधीपूर्वक पार पडला. जेव्हापासून राम लालाची मूर्ती दिसली, तेव्हापासून प्रत्येकाच्या ओठावर फक्त ‘जय श्री राम’ हाच जयघोष आहे. पण मूर्ती पाहिल्यानंतर तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की, मूर्तीचा रंग काळा का? यामागे काही विषेश कारण आहे. ते आपण जाणून घेऊया.
राम लालाची मूर्ती शिला दगडापासून बनवण्यात आली आहे, ज्याला कृष्ण शिला म्हणून ओळखले जाते, म्हणूनच राम लालाची मूर्ती काळ्या रंगाची आहे, ज्याला आपण श्यामल देखील म्हणतो. शिला दगडाचे स्वतःचे अनेक गुणधर्म आहेत.
राम लालाची मूर्ती या दगडापासूनच का बनवली गेली? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या दगडाच्या गुणधर्मांमध्ये मिळेल. वास्तविक रामललाच्या पूजेच्या वेळी त्यांना दुधाचा अभिषेक करण्यात आला होता. आता या दगडाच्या गुणधर्मामुळे दुधाच्या अभिषेकामुळे मूर्तीवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच हे दूध तिर्थ म्हणून दिल्यास आरोग्यासाठी हानिकारक नाही. हजार वर्षे या दगडाचे आयुष्य आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही.
याशिवाय वाल्मिकी रामायणात वर्णन केलेल्या भगवान रामाच्या रूपात त्यांचे वर्णन गडद वर्णाचे, अतिशय सुंदर, कोमल आणि आकर्षक असे केले आहे. त्यामुळे रामललाच्या मूर्तीचा रंग काळा ठेवण्यात आला आहे. मान्यतेनुसार जन्मभूमीत बालरूपाची पूजा केली जाते. या कारणास्तव भगवान श्रीरामाची मूर्ती बालकाच्या रूपात बनवण्यात आली आहे.
प्राणप्रतिष्ठा प्रक्रिया म्हणजे मूर्तीमध्ये प्राण प्राणाचा अंश टाकणे. प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय मूर्तीपूजा पूर्ण मानली जात नाही. मूर्तीत प्राण आणण्यासाठी, मंत्रोच्चारांसह देवांना आवाहन केले जाते. त्यामुळे कोणत्याही मूर्तीची पूजा केली तरी तिचा अभिषेक करणे अत्यंत आवश्यक आहे.