बांके बिहारी मंदिरात मुर्तीसमोर का टाकला जातो दर दोन मिनीटांनी पडदा? आश्चर्यकारक आहे कारण

| Updated on: Feb 26, 2023 | 2:14 PM

या मंदिरात बिहारीजींची काळ्या रंगाची मूर्ती आहे. या मूर्तीमध्ये श्रीकृष्ण आणि राधा विराजमान असल्याचे मानले जाते. म्हणूनच फक्त त्याच्या दर्शनाने तुम्हाला राधा-कृष्णाच्या दर्शनाचे फळ मिळते.

बांके बिहारी मंदिरात मुर्तीसमोर का टाकला जातो दर दोन मिनीटांनी पडदा? आश्चर्यकारक आहे कारण
बांके बिहारी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : वृंदावनचे बांके बिहारी मंदिर (Banke Bihari Temple) ऐतिहासीक आणि चमत्कारांनी भरलेले आहे. येथे श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर वारंवार पडदा टाकला जातो. मथुरेच्या वृंदावनात असलेल्या या मंदिराला हजारो भाविक भेट देतात. वृंदावनाच्या प्रत्येक कणात भगवान श्रीकृष्ण वास करतात असे मानले जाते. भगवान श्रीकृष्णांनी वृंदावनात अनेक लीला केल्या आहेत. चला जाणून घेऊया बांके बिहारी मंदिराचा इतिहास काय आहे आणि बांके बिहारीजी कसे प्रकट झाले आणि त्यांच्या मूर्तीसमोर वारंवार पडदा का टाकला जातो?

बांके बिहारी यांची मुर्ती

पौराणिक मान्यतेनुसार स्वामी हरिदास हे भगवान श्रीकृष्णाचे निस्सीम भक्त होते. ते निधीवनात श्रीकृष्णाची नेहमी प्रेमाने पूजा करत असत. त्यांच्या हृदयात भगवान श्रीकृष्ण वास करत होते. स्वामी हरिदासांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्णांनी त्यांना दर्शन दिले आणि निधिवनात काळ्या रंगाच्या दगडी मूर्तीच्या रूपात प्रकट झाले. निधिवनातच काही दिवस स्वामी हरिदासांनी बांके बिहारीची पूजा केली. त्यानंतर कुटुंबीयांच्या मदतीने त्यांनी बांके बिहारी मंदिर बांधून घेतले. बांकेबिहारीला भेट देणारा भक्त श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन होतात अशी श्रद्धा आहे. देवाचे दर्शन व पूजा केल्याने भक्ताचे सर्व संकट दूर होतात.

बांके बिहारींच्या चरणांचे दर्शन घेतले जाते

या मंदिरात बिहारीजींची काळ्या रंगाची मूर्ती आहे. या मूर्तीमध्ये श्रीकृष्ण आणि राधा विराजमान असल्याचे मानले जाते. म्हणूनच फक्त त्याच्या दर्शनाने तुम्हाला राधा-कृष्णाच्या दर्शनाचे फळ मिळते. दरवर्षी मार्गशीष महिन्याच्या पाचव्या दिवशी बांके बिहारी मंदिरात बिहारीजींचा प्रकटोत्सव साजरा केला जातो. वैशाख महिन्याच्या तिसऱ्या तारखेला, ज्याला अक्षय्य तृतीया म्हणतात, वर्षभरात फक्त याच दिवशी बांकेबिहारींचे पाय दिसतात. या दिवशी भगवंताच्या चरणांचे दर्शन घेणे अत्यंत शुभ व फलदायी आहे.

हे सुद्धा वाचा

वारंवार पडदा टाकण्या मागची कहाणी

तुम्ही बांके बिहारीच्या मंदिरात गेला असाल तर देवाच्या मूर्तीसमोर वारंवार पडदा टाकला जातो हे तुम्ही पाहिलं असेल. म्हणजेच त्यांचे दर्शन सतत होत. एका आख्यायिकेनुसार 400 वर्षांपूर्वीपर्यंत बांकेबिहारींच्या मंदिरासमोर पडदा टाकण्याची प्रथा नव्हती. भाविकांना हवे तितके दिवस मंदिरात राहून ठाकूरजींचे दर्शन घेता येत असे.

एकदा एक भक्त बांकेबिहारींचे दर्शन घेण्यासाठी श्रीधाम वृंदावनात आला. मग तो सतत भगवान बांके बिहारीजींच्या मूर्तीकडे टक लावून पाहू लागला. त्या काळात देव त्याच्या प्रेमाने वश होऊन भक्तासोबत निघून गेले. जेव्हा पुजाऱ्याने मंदिरात कृष्णाची मूर्ती नसल्याचे पाहिले तेव्हा त्यांनी मंदिरात येण्यासाठी देवाची विनवणी केली आणि देव मंदिरात परत आले तेव्हापासून प्रत्येक 2 मिनिटांच्या अंतराने ठाकूरजींच्या समोर पडदा लावण्याची परंपरा सुरू झाली.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)