नागपूर : रामटेक ते अदासा (Adasa) हे अंतर 58 किलोमीटर आहे. नागपूरवरून सावनेरला जाताना 36 किमी अंतरावर आहे. सावनेरवरून अदासा हे 8 किलोमीटर अंतरावर आहे. नागपूरवरून अदासा जवळपास 44 किमी अंतरावर आहे. उजवीकडं हनुमान मंदिर अतिशय आकर्षक पद्धतीनं बनविलेला आहे. हनुमानजींची झोपलेली मूर्ती येथे आहे. दुकानं सजलेली असतात. कँटिनही आहेत. चहा, नास्ता करता येतो. फुलंही मंदिर परिसरातून खरेदी करता येतील. गणशेजींसाठी खोव्यापासून बनविलेला पेढा येथे प्रसिद्ध आहे. गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) वेळी गर्दी असते. कोविडमध्ये (Kovid) हा मंदिरही इतर मंदिरांप्रमाणे बंद होता. मंदिर उंच ठिकाणी असल्यानं आजूबाजूचा नजारा सुंदर दिसतो.
बळी हा शेतकऱ्यांचा राजा होता. ईडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो, असं म्हणतात. वामनानं बळीराजाला कपटाने मारले असे म्हटले जाते. राजा बळीनं शंभर यज्ञांचा संकल्प केला. वेदिक गुरू शंकराचार्यानं शक्ती वाढविण्यासाठी हे यज्ञ करण्याचा सल्ला दिला होता. यज्ञाचा विध्वंश करण्यासाठी, वामनाने स्वतःला शक्ती प्रदान करण्यासाठी गणपतीची आराधना येथे केली. गणपतीच्या कृपेने बळीच्या यज्ञाचा विध्वंश केला. वामनाने तीन पावले जमीन मागून बळीराजाला पाताळात गाडले, अशी कथा पुराणात सांगितली जाते. वामनानं येथे गणेश मूर्तीची स्थापना केली, अशी कथा अदासाबद्दल सांगितली जाते.
मुषकाच्या कानात बोलण्याची प्रथा आहे. मुषक हे गणपतीचं वाहन आहे. आपली मागणी लोकं मुषकाच्या कानात सांगितात. ती पूर्ण होत असल्याची भावना आहे. मुलांना खेळण्यासाठी बगीचा आहे. वॉटरफॉल्स बनविण्यात आलाय. कच्चा चिवडा प्रसिद्ध आहे. मुरमुरा, सांभार, फुटाणा, फल्लीदाना, सेव, कांदा यापासून हा कच्चा चिवडा बनविला जातो. वातावरण अतिशय सुंदर आहे. त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भेट देतात.