Nag Panchami : का साजरी केली जाते नागपंचमी?, या शुभमुहूर्तावर करा पूजा

| Updated on: Aug 07, 2023 | 4:10 PM

नाग हा महादेवाला प्रीय होता. महादेव वासुकी सापाला आपल्या गळ्यात ठेवत होते. नागपंचमीला नागांची पूजा केल्याने महादेवाचे आशीर्वाद मिळतात.

Nag Panchami : का साजरी केली जाते नागपंचमी?, या शुभमुहूर्तावर करा पूजा
Follow us on

हिंदू धर्मात नागपंचमीला जास्त महत्त्व आहे. नागपंचमी ही श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरी केली जाते. यावर्षी नागपंचमी २१ ऑगस्ट रोजी आहे. जो कोणी या दिवशी नागदेवतेची पूजा करतो त्याची सापाबद्दलची भीती निघून जाते. कुंडलीतील कालसर्प दोष दूर करण्यासाठी नागदेवतेची पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी महादेवाची पूजा केली जाते.

यंदाची नागपंचमी विशेष सांगितली गेली आहे. यंदाच्या नागपंचमीला दोन शुभ संयोग आहेत. यावेळी शुक्ल योग आणि अभिजीत मुहूर्त असा संयोग आहे. या शुभ योगाचा परिणाम चार राशींवर होईल. या चार राशींमध्ये मेष, वृश्चिक, धनू आणि कुंभ आहे. नागपंचमीला हे दोन शुभ योग आल्याने वरील चार राशींवरील दुःख नष्ट होईल. वैवाहित जीवनात आनंद येईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.

नागपंचमीचा शुभ मुहूर्त

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचम तिथी २१ ऑगस्ट रोजी सकाळी १२ वाजून २१ मिनिटांनी सुरू होईल. २२ ऑगस्ट रोजी सकाळ दोन वाजता संपेल. नागपंचमीची पूजा शुभ मुहूर्त सकाळी ५.५३ ते ८.२९ पर्यंत राहील.

नागपंचमी का साजरी केली जाते?

नागपंचमी सण साजरे करण्याचे काही कारणं सांगितले जातात. नाग हा महादेवाला प्रीय होता. महादेव वासुकी सापाला आपल्या गळ्यात ठेवत होते. नागपंचमीला नागांची पूजा केल्याने महादेवाचे आशीर्वाद मिळतात. नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्याने कालसर्पदोष दूर होत असल्याचे सांगितले जाते.

ऐतिहासिक कथा

अर्जूनाचा नातू राजा परीक्षितचा मुलगा जन्मजेय यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी नागांचा कूळ संपवण्यासाठी यज्ञ केला. कारण त्याच्या वडिलांना तक्षक सापाने मारले होते. ऋषी जरत्कारूचा मुलगा आस्तिक मुनीला ही बाब माहीत होताच त्यांनी नागाचे कूळ वाचवण्यासाठी यज्ञ थांबविला. हा यज्ञ श्रावण महिन्याच्या शुक्ल पंचमीला थांबवला होता. तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते.

नागपंचमी पूजेची विधी

नागपंचमीच्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करावी. स्वच्छ कपडे घालून शिवलिंगावर पाणी, कच्चे दूध, दही आणि शहदाचा अभिषेक करावा. त्यानंतर नागदेवतेचाही अभिषेक करावा. नागदेवतेवर दूध चढवून नागदेवतेची आरती करावी.