मुंबई : एखाद्या ठिकाणी वाढदिवस, पुजा किंवा लग्नसंभारंभ यासारख्या प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात कपाळावर टिळा लावला जातो. अनेकदा चंदन, केशर आणि इत्यादी गोष्टींचा वापर करुन कपाळावर टिळा लावला जातो. सर्वाधिक वेळेला टीळा लावताना लाल रंगाच्या कुंकूवाचा वापर केला जातो. अनेकदा टिळा लावल्यानंतर त्यावर तांदळाचे काही दाणे लावले जातात. इतकंच नव्हे तर ओवाळणी केल्यानंतर काही तांदळाचे दाणे तुमच्या डोक्यावर आणि आजूबाजूलाही फेकले जातात. पण यामागचे नेमकं कारण काय? याची तुम्हाला माहिती आहे का? हे करण्यामागे अनेक तर्क-विर्तक कारण सांगितली जातात. यामागचे नेमकं कारण काय, चला जाणून घेऊया… (Why rice is applied after applying tilak know the reason)
कपाळावर टिळा लावल्यानंतर तांदूळ लावणे हा श्रद्धेचा भाग आहे. आपल्याकडे दीर्घकाळापासून ही परंपरा सुरु आहे. यामुळेच टिळा लावताना कुंकूसोबत तांदळाचाही वापर केला जातो. तर काही अहवालात दिलेल्या माहितीनुसार, तांदूळ हे सर्वात शुद्ध धान्य मानले जाते. घरातील अनेक छोट्या छोट्या विधीपासून ते मोठ्या विधीपर्यंत तांदळाला विशेष महत्त्व दिले जाते. देवाला अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्यातही भाताला फार महत्त्व असते. त्यामुळे प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात तसेच विशेष प्रसंगी तांदळाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते.
इतकचं नव्हे तर होम हवन करतेवेळी तांदूळ हे अर्पण केले जाते. तांदूळ हे शुद्ध धान्य आहे. त्यामुळेच तांदळाला अक्षता असेही म्हणतात. अक्षता म्हणजे जे कधीही नष्ट होणार नाही असे… यामुळे कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी तांदळाचा वापर केला जातो. याच कराणामुळे टिळा लावल्यानंतर तांदळाचा वापर केला जातो. त्यासोबतच हिंदू धर्मात भात हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे त्याचा वापर केला जातो.
काही अन्य कारण
तसेच कपाळावर टिळा लावल्यानंतर तांदूळ लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे तांदळाचा वापर केला जातो. तसेच ओवाळणी केल्यानंतर डोक्यावर आणि आजूबाजूला तांदळाचे दाणे टाकल्याने सकारात्मक उर्जा पसरते. याच कारणामुळे तांदूळ हे कपाळावर लावण्यासोबतच आजूबाजूला फेकले जातात. (Why rice is applied after applying tilak know the reason)
संबंधित बातम्या :
पुढच्या आठवड्यात दिसणार वर्षातील शेवटचा ‘सुपर फ्लॉवर मून’, जाणून घ्या भारतात कसे दिसेल चंद्रग्रहण
भारतीय रेल्वेतील जंक्शन, टर्मिनल आणि सेंट्रल या शब्दांचा अर्थ काय? जाणून घ्या