मुंबई : हिंदू धर्मात प्रत्येक विधीला अनन्यसाधारण महत्त्व मानले जाते. विवाह संस्कार हा 16 संस्कारांपैकी एक आहे, जो विवाहादरम्यान दोन आत्म्यांना जोडण्याचे काम करतो. लग्नाच्या चालीरीतींबद्दल बोलायचे तर ते दोन व्यक्तींना जोडतेच पण आयुष्यातील प्रत्येक जबाबदारी पार पाडायला शिकवते. हिंदू धर्मात सात फेऱ्यांशिवाय लग्न पूर्ण मानले जाते . चला तर मग जाणून घेऊया लग्नाच्या वेळी सात फेरे ज्याला आपण सप्तपदी (Saptapadi) म्हणतो ती का घेतली जाते आणि त्यांचे काय महत्त्व आहे.
हिंदू धर्मात लग्नादरम्यान सप्तपदी हा विधी असतो. ज्याला सात जन्मांचे बंधन मानले जाते. लग्नात, वधू आणि वर अग्निच्या साक्षीने सात फेरे घेतात, जेणेकरून ते पुढील सात जन्म एकत्र राहू शकतील. पती-पत्नीचे नाते तन, मन आणि धनाने जपण्याचे वचनही तो देतो. सनातन धर्मात दोन व्यक्तींचा आत्मा आणि शरीर एकत्र येण्याला सात फेरे आणि सात शब्दांचे महत्त्व आहे. असे मानले जाते की या सात फेऱ्या आणि सात वचनांमुळे वधू-वर सात जन्म एकत्र राहतात.
हिंदू धर्मग्रंथानुसार, पृथ्वीवर सापडलेल्या सर्व महत्त्वाच्या वस्तूंची संख्या 7 मानली जाते. जसे की इंद्रधनुष्याचे सात रंग, सात तारे, सात सुर, सात दिवस, सात चक्र, मनुष्याच्या सात क्रिया इ. याच कारणामुळे पौराणिक मान्यतांमध्ये 7 हा अंक शुभ मानला जातो. त्यामुळे लग्नादरम्यानही सात फेरे घेण्याची परंपरा आहे आणि या फेऱ्यांनंतर पती-पत्नी आयुष्यभरासाठी एक होतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)