मुंबई : एखाद्या मंदिरात दान देतांना किंवा एखाद्याला भेट म्हणून पैशांचे पाकिट देतानां त्या हमखास एक रूपयाचे नाणे टाकले जाते. तुम्हीसुद्धा बऱ्याचदा असे केले असेलच. बऱ्याचदा घरच्या मोठ्यांचे अनुकरण करत आपण हे करत आलेलो असतो. देणगी अकरा रूपयांची असो किंवा एक लाखाची प्रत्त्येकच जण हा शकुनाचा एक रूपया नक्की देतो. पण हिंदू धर्मात या 1 रुपयाच्या नाण्याचे काय महत्त्व (Importance of one rupee coin) आहे हे तुम्हाला माहीत आहे का? दानधर्म आणि शगुन वगैरेमध्ये एक रुपया वाढवून का दिला जातो? यामागचे कारण अनेकांना माहिती नही. जाणून घेऊया यामागे काय कारण आहे.
असे मानले जाते की, शून्य हे शेवटाचे प्रतिक आहे, तर ‘एक’ नवीन सुरुवात दर्शवते. हा अतिरिक्त एक रुपया हे सुनिश्चित करतो की ज्यांना हे पाकीट दिले जात आहे त्या प्रत्येकाच्या आयुष्याची सुख समृद्धीने सुरुवात व्हावी. त्यामुळे शून्यासह पाकीट देणे शुभ मानले जात नाही. त्याच बरोबर जर गणिती अर्थाने पाहिल्यास, 100, 500 आणि 1000 या संख्यांना निःशेष भाग जातो, पण 101, 501 आणि 1001 या संख्यांना भाग जात नाही. पाकीट देणे हा एक प्रकारचा आशीर्वाद असतो, आणि आपल्या या शुभेच्छा आणि आशीर्वाद नेहमी अविभाज्य असावेत, अशी आपली इच्छा असते. म्हणून 100 रुपयांसोबत, एक रुपया आठवणीने जोडावा.
याशिवाय देणगीत एक रुपया देण्याचे अजून एक कारण म्हणजे एक रुपया मूळ रकमेच्या पुढे असलेल्या सातत्याचे प्रतीक आहे. याने दाता आणि प्राप्तकर्ता यांच्यातील बंध मजबूत होतात. याचा सरळ अर्थ असा की, आमचे चांगले नाते कायम राहील आणि आम्ही नेहमी प्रेमाच्या बंधांनी कायम बांधले जाऊ.
पाकीट तयार करताना हेही लक्षात ठेवा की, जोडलेला एक रुपया हे नाणे असावे परंतु कधीही एक रुपयाची नोट नसावी. नाणे धातूचे बनलेले असते, जे पृथ्वीतत्वापासून येते आणि त्याला देवी लक्ष्मीचा भाग मानले जाते. मोठी रक्कम ही गुंतवणूक असली तरी, एक रुपयाचे नाणे हे त्या गुंतवणुकीच्या पुढील वाढीचे “बीज” आहे. आता तुम्हाला कळले असेल हे एक रूपयाचे नाणे किती महत्त्वाचे आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)