मुंबई : हिंदू धर्मात मंदिर हे सर्वात पवित्र श्रद्धास्थान मानल्या गेले आहे. आपल्यापैकी अनेक जण नियमीत मंदिरात (Positivity in Temple) जातात. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर लोकं अनेकदा पायऱ्यांवर बसल्याचे तुम्ही पाहिले असेल. यामागे एक खास कारण आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. तुम्हीही नकळत हे अनेकदा केले असेल. पण यामागील नेमके कारण काय आहे हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. मंदिराच्या पायरीवर बसणे ही एक पद्धत आहे. त्यामागे धार्मिक आणि शास्त्रिय असे दोन्ही करण आहे.सनातन धर्मात मंदिर हे देवांचे निवासस्थान मानले जाते. तसेच ते देवांच्या स्वरूपाचेही प्रतिनिधीत्व करते. धार्मिक मान्यतेनुसार, मंदिराचे शिखर हे देवतेचे मुख मानले जाते आणि त्याच्या पायऱ्या त्यांचे चरण मानले जातात. यामुळेच शिखराच्या दर्शनाच्या वेळी उघड्या डोळ्यांनी देवतेचे ध्यान करावे आणि भक्तांनी मंदिराच्या पायरीवर बसल्यावर डोळे बंद करून देवतांचे स्मरण करावे, अशी यामागची धार्मिक भावना आहे.
मंदिराच्या पायऱ्या या देवतेच्या चरणाप्रमाणे आहेत. म्हणूनच तिथे डोळे मिटून बसून जो खऱ्या मनाने देवाची प्रार्थना करतो. त्याची इच्छा लवकरच पूर्ण होते. एवढेच नाही तर असे केल्याने मानवी जीवनातील दुःख दूर होतात. यासोबतच मनाला शांती आणि आराम मिळून धन, सुख आणि समृद्धीही प्राप्त होते. या वेळी प्रार्थना केल्याने जीवनात नकळत केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते. म्हणूनच जेव्हा जेव्हा भक्त मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या पायरीवर बसतात तेव्हा त्यांनी या सर्व गोष्टींसाठी देवाची माफी मागून मनापासून प्रार्थना केली पाहिजे. याशीवाय मंदिराचे शिखर पाहिल्याने देवतेच्या दर्शनाप्रमाणेच फल प्राप्त होते, अशीही एक धार्मिक धारणा आहे. म्हणूनच मंदिरातील शिखराचे दर्शनही मस्तक टेकूनच केले पाहिजे.
मंदिरात मोठ्या प्रमाणात सकारात्मक उर्जा असते. ती उर्जा मंदिराच्या गाभाऱ्यापासून ते पायऱ्यांपर्यंत सर्वदूर संचारीत असते. मंदिरात किंवा मंदिराच्या पायऱ्यांवर थोडावेळ बसल्याने ती सकारात्मक उर्जा आपल्याला प्राप्त होते. आपल्या विचारात आपण ते अनुभवू शकतो. नकारात्मक विचारांची साखळी तुटायला यामुळे मदत होते. याशिवाय विचारांचा गोंधळ कमी होऊन समस्यांतून मार्ग काढण्यासाठी सकारात्मकतेने विचार केल्या जातो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)