महिलांनी नारळ का फोडू नये? तुम्हालाही माहिती नसेल खर कारण

| Updated on: Jan 14, 2025 | 7:15 PM

हिंदू धर्मात नारळाला विशेष महत्त्व दिले जाते. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी किंवा नवीन गाडी घेतल्यावर नारळ फोडले जाते. मात्र तुम्हाला माहिती आहे का की महिला नारळ का फोडत नाहीत?

महिलांनी नारळ का फोडू नये? तुम्हालाही माहिती नसेल खर कारण
Image Credit source: tv9
Follow us on

हिंदू धर्मामध्ये नारळाला अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र मानले जाते. नारळाचा उपयोग अनेक गोष्टींसाठी केला जातो. कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्याच्या सुरुवातीला नारळाचा उपयोग केला जाते. हिंदू धर्मानुसार, कोणत्याही पूजा किंवा हवनमध्ये नारळाचा उपयोग केला जातो. घरामध्ये कोणतीही पूजा असेल, घरामध्ये लग्न समारंभ असेल किंवा नवीन गाडी घेतली असेल तर नारळ अर्पित केला जाते. अगदी कुठेही फिरायला जाताना किंवा शुभ कार्यासाठी जाताना गाडीसमोर नारळ फोडला जातो.

परंतु अनेकांना प्रश्न पडतो की हा नारळ फक्त फुरुषच का फोडतात. महिलांना नारळ फोडताना तु्म्ही कधी पाहिलं नसेल. हिंदूधर्मामध्ये शुभ कार्यापूर्वी नारळ फोडला जातो. परंतु महिलांना नरळ फोडायला का देत नाहीत असा प्रश्न अनेकदा मनामध्ये निर्माण होतो. महिलांसाठी नारळ फोडणे खरच अशुभ आहे का आणि त्या मागचे मुख्य कारण काय चला जाणून घेऊया?

नारळाचे महत्त्व :- नारळाचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जाते. नारळाचे तुमच्या शरीराला अनेक फायदे आणि औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. नारळाचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला आवश्यक पोषण मिळते. याशिवाय नारळ विष्णू देव आणि लक्ष्मी देवीचे फळ मानले जाते. धर्मानुसार, जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही कार्यापूर्वी देवी देवतांना अर्पण केले चतर तुमच्या पैशां संबंधीत सर्व समस्या दूर होतात.

महिलांना नारळ का फोडून देत नाही?

शास्त्रानुसार, नारळ हे बीज मानले जाते. मान्यतेनुसार, महिलांनी नारळ फोडला तर त्यांच्या गर्भाशयावर त्याचा मकारात्मक परिणाम होऊ शकतो. याशिवाय ग्रांथांच्या मान्यतेनुसार, पृथ्वीवर पहिल्यांना विष्णू भगवानने लक्ष्मी देवीसोबत नारळ फळाच्या रूपात पाठवले होते. शास्रानुसार, नारळ फोडणे म्हणजे बिया फोडण्यासारखे आहे. नारळावर फक्त देवी लक्षमीचा आधिकार आहे. त्यामुळे महिलांनी नारळ फोडू नये.

महिला मुलांना जन्म देतात. मान्यतेनुसार, ते केवळ बीजाच्या रूपात संतती निर्माण करतात. त्यामुळे महिलांनी नारळ कधीच फोडू नये. जर एखाद्याला महिलेनी नारळ फोडला तर त्यांच्या गर्भाशयात किंवा मुलाच्या आयुष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात. महिला मुलांना जन्म देतात त्यामुळे हे चक्र सरखे चालू राहाते. त्यामुळे महिलांनी चुकूनही नारळ फोडू नये.