लक्ष केंद्रित न करणे, वारंवार राग येणे किंवा सारखी चिंता असणे या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी मेडिटेशन सर्वात रामबाण उपाय आहे. मेडिटेशनमुळे चिंता, तणाव आणि रक्तदाब नियंत्रित होतो. मेडिटेशन करण्याचे फायदे सांगण्यासाठी आणि लोकांना मेडिटेशन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी दरवर्षी 21 डिसेंबर रोजी जागतिक मेडिटेशन दिन साजरा केला जातो.
जागतिक ध्यान दिन साजरा करण्याची सुरुवात सगळीकडे सुरु झाली आहे. मेडिटेशनचा इतिहास ५००० पूर्वीचा आहे. हिंदू, जैन, बौद्ध, शीख आणि यहुदी अशा सर्व धर्मातही याचा उल्लेख आढळतो. चला तर मग तुम्हाला मेडिटेशन करण्याचा योग्य मार्ग कोणता हे जाणून घेऊयात
योग्य जागा निवडा
मेडिटेशन करण्यासाठी शांत आणि कमी गर्दीची जागा निवडा, अशी जागा जिथे तुम्ही आरामात बसू शकता आणि तुमच्या सभोवताल कोणताही आवाज नसेल. अश्याने तुम्हाला मेडिटेशन करताना कोणताही त्रास होणार नाही.
योग्य आसन
मेडिटेशन करताना तुम्ही योग्य स्थितीत बसता आले पाहिजे म्हणून मेडिटेशनमध्ये शारीरिक आसनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मेडिटेशन करताना तुम्ही पाय एकत्र जोडून किंवा पद्मासन (कमलासन) सारख्या आसनात बसू शकता. त्यानंतर तुमची पाठ सरळ असावी आणि शरीरात ताण आले नाही पाहिजे.
श्वासांवर लक्ष केंद्रित करा
योग्य आसनात बसल्यावर सुरुवातीला खोल आणि स्थिर श्वास घ्या. आणि हळू हळू तुमच्या श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा. श्वासावर नियंत्रण ठेवल्यास मानसिक शांती मिळेल.
मेडिटेशनची वेळ
जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मेडिटेशन करत असाल तर ,सुरुवातीला ५ ते १० मिनिटे मेडिटेशन करू शकता.
सकारात्मक दृष्टिकोन
मेडिटेशन करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मेडिटेशन दरम्यान तुम्ही मंत्राचा जपही करू शकता.
संयम आणि नियमितता
मेडिटेशन करणे हा एक अभ्यास आहे. जो कालांतराने वेळेनुसार अधिकच प्रभावी होत चालेला आहे. मेडिटेशन केल्याने तुम्ही याचा लगेच फायदा जाणवत नाही पण नियमित मेडिटेशन केल्याने मानसिक आणि शारीरिक फायदे होत असतात.
ध्यान कोणी करावे?
ज्या लोकांना सर्वाधिक मानसिक ताण आहे किंवा चिंतेशी झगडत आहेत त्यांनी लोकांनी दररोज मेडिटेशन करावे. याशिवाय निद्रानाशाने त्रस्त असलेले लोकही मेडिटेशन करू शकतात. मेडिटेशन केल्याने तुमचे मानसिक आरोग्य स्थिर राहते आणि शारीरिक स्थितीला खूप आराम मिळतो. मेडिटेशन करत राहिल्याने तुम्हाला कोणतेच आजार होत नाही.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)