मुंबई : हिंदू धर्मात भगवान यमराजला मृत्यूचा देवता मानला जातो (Yamraj Could Also Die). यमराज जर स्वत: मृत्यूचा देव असेल तर त्याचा मृत्यू कसा शक्य आहे? ही गोष्ट हास्यास्पद वाटत असली तरी वेद आणि पुराणात त्यांच्या मृत्यूची कहाणी सांगितली गेली आहे (Yamraj Could Also Die Know What Is The Truth Behind This).
ही कथा सांगण्यापूर्वी यमराजबद्दल जाणून घेणे फार महत्वाचे आहे. यमराजला यमुना किंवा यमी नावाची जुळी बहिण होती. यमराज हे म्हशीची सवारी करतात. यम, धर्मराजा, मृत्यू, दहशत, वैवस्वत, काल अशा वेगवेगळ्या नावांनी यमराजाची पूजा केली जाते.
बऱ्याच काळापूर्वी एक स्वेत मुनी होते, जे भगवान शिवचे मोठे भक्त होते. ते गोदावरी नदीच्या काठावर राहायचे. जेव्हा त्यांच्या मृत्यूची वेळ आली तेव्हा यम देवाने त्यांचे प्राण हरण्यासाठी मृत्युपाशाला पाठवलं. परंतु स्वेत मुनीला अद्याप आपले प्राण सोडायचे नव्हते. मग त्यांनी महामृत्युंज मंत्राचा जप करण्यास सुरवात केली. मृत्युपाश स्वेत मुनीच्या आश्रमात पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की भैरव बाबा आश्रमाबाहेर पहारा देत आहेत.
धर्म आणि उत्तारदायित्वांचे बांधील असल्यामुळे मृत्युपाश स्वेत मुनीजवळ त्यांचे प्राण हरण्यासाठी पोहोचताच भैरव प्रहार करुन मृत्युपाश बेशुद्ध केले, तो जमिनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. हे पाहून यमराज अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी स्वत: येऊन भैरव बाबांना मृत्यूपाशमध्ये बांधलं. त्यानंतर स्वेत मुनीचे प्राण हरण्यासाठी त्यांच्यावरही मृत्युपाश फेकले. तेव्हा स्वेत मुनींनी महादेवाला आवाज दिला. तेव्हा महादेवाने पुत्र कार्तिकेयला तिथे पाठवलं.
कार्तिकेय तेथे पोहोचल्यावर कार्तिकेय आणि यमदेव यांच्यात भयंकर युद्ध झाले. कार्तिकेयसमोर यमदेव फारकाळ टिकू शकले नाही आणि कार्तिकेयाच्या एका प्रहारावर ते जमिनीवर पडले आणि त्याचवेळी त्यांचा मृत्यू झाला. भगवान सूर्य यांना जेव्हा यमराजच्या मृत्यूबद्दल कळले तेव्हा ते विचलित झाले. चिंतन केल्यावर त्यांना हे ज्ञात झाले की महादेवांच्या इच्छेविरोधात त्यांनी स्वेत मुनीचे प्राण हरण्याचा प्रयत्न केला. यामुळे शनिदेवाला भगवान भोलेनाथचा राग सहन करावा लागला. यमराज हा सूर्य देवाचा पुत्र आहे आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी सूर्य देव विष्णूकडे गेले.
भगवान विष्णूंनी सूर्यदेवाला तपश्चर्येद्वारे भगवान शिव यांना प्रसन्न करण्याचा सल्ला दिला. सूर्यदेवाने भगवान शिव यांची तीव्र तपश्चर्या केली. ज्यामुळे भोलेनाथ प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन दिले आणि त्यांना वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा सूर्यदेव म्हणाले, हे महादेव! यमराजांच्या मृत्यूनंतर अथांग पृथ्वीवर असंतुलन पसरलं आहे. पृथ्वीवर संतुलन ठेवण्यासाठी यमराजला पुन्हा जिवंत करा. तेव्हा महादेवांनी नंदीकडून यमुनेचे पाणी मागवले आणि ते यमराजच्या पार्थिवावर टाकले, ज्याने ते पुन्हा जिवंत झाले.
Hanuman Jayanti 2021 | विवाहित आणि पिताही होते ब्रह्मचारी हनुमान, जाणून घ्या त्यांच्या पत्नी आणि पुत्राची कहाणीhttps://t.co/cZAVUJA8zK#HanumanJayanti2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 27, 2021
Yamraj Could Also Die Know What Is The Truth Behind This
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
जेव्हा भगवान नरसिंहाला शांत करण्यासाठी महादेवाने घेतला सर्वेश्वर अवतार, जाणून घ्या नेमकं काय घडले?
‘रामायणा’त रावणाच्या पायाखाली निळ्या रंगाचा ‘तो’ व्यक्ती नेमका कोण? जाणून घ्या उत्तर…
Bhai Dooj 2020 | औक्षणासाठी शुभ मुहूर्त कोणता? भाऊबीजेची आख्यायिका जाणून घ्या