मुंबई : दिनदर्शिकेनुसार यशोदा जयंती (Yashoda Jayanti 2024) फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथीला साजरी केली जाते. यशोदा जयंती ही भगवान श्रीकृष्णाची आई यशोदा यांच्या वाढदिवसानिमित्त साजरी केली जाते. माता यशोदेने भगवान श्रीकृष्णाचे पालनपोषण केले, तर माता देवकीने त्यांना जन्म दिला. यशोदा मातेचा वाढदिवस संपूर्ण उत्तर भारतात यशोदा जयंती म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
या दिवशी माता यशोदासोबत भगवान श्रीकृष्णाचीही पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी व्रत आणि उपासना केल्याने महान अपत्याचा जन्म होतो. यशोदा जयंती हा पवित्र सण भगवान कृष्णाच्या सर्व मंदिरांमध्ये तसेच जगभरातील इस्कॉन मंदिरांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यशोदा जयंती हा सण गुजरात, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतीय राज्यांमध्येही साजरा केला जातो.
हे व्रत मातांसाठी खूप खास मानले जाते. हे व्रत आईच्या मुलावरील प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करतात. या दिवशी माता यशोदा आणि भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा करून उपवास केल्यास संतानप्राप्तीची मनोकामना लवकर पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे.
यशोदा जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठा, घर स्वच्छ करा, आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला. एक चाैरंग घेऊन त्यावर लाल कपडा पसरवा आणि कलशाची स्थापना करा. आता यशोदा माता यांच्या कुशीत बालस्वरूपात बसलेल्या श्रीकृष्णाचा फोटो किंवा मूर्तीची स्थापना करा. आता तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावा आणि रोळी, तांदूळ, फळे, फुले, मिठाई आणि लोणी इत्यादी अर्पण करा. यानंतर यशोदा जयंतीची कथा ऐकावी. पूजेच्या शेवटी आरती झाल्यावर सर्व चुकांची क्षमा मागून नैवेद्य व प्रसाद वाटप करावा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)