तुळशीच्या सुकलेल्या पानांनी चमकेल तुमचे भाग्य; ‘या’ उपायांनी होईल माता लक्ष्मी प्रसन्न!

| Updated on: Jun 28, 2022 | 12:33 PM

हिंदू धर्मात तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानले जाते. भगवान श्री विष्णूची पूजा (vishnu puja) तुळशीशिवाय अपूर्ण आहे. त्यामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार तुळशीच्या रोपाला पाणी देऊन त्यासमोर दिवा लावल्याने सौभाग्य प्राप्त होते. त्याचबरोबर तुळशीची कोरडी पानेही खूप महत्त्वाची आहेत (dried leaves of basil). यासाठी काही ज्योतिषीय उपाय केल्यास धन-संपत्तीचा वर्षाव होतो. अशा […]

तुळशीच्या सुकलेल्या पानांनी चमकेल तुमचे भाग्य; या उपायांनी होईल माता लक्ष्मी प्रसन्न!
Follow us on

हिंदू धर्मात तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानले जाते. भगवान श्री विष्णूची पूजा (vishnu puja) तुळशीशिवाय अपूर्ण आहे. त्यामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार तुळशीच्या रोपाला पाणी देऊन त्यासमोर दिवा लावल्याने सौभाग्य प्राप्त होते. त्याचबरोबर तुळशीची कोरडी पानेही खूप महत्त्वाची आहेत (dried leaves of basil). यासाठी काही ज्योतिषीय उपाय केल्यास धन-संपत्तीचा वर्षाव होतो. अशा लोकांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. आषाढ आणि कार्तिक महिन्यात तुळशीला फार महत्त्वाचे स्थान दिले जाते.  एकदा श्रीकृष्णाची तुला करताना एका पारड्यात श्रीकृष्णाला आणि दुसऱ्या पारड्यात सर्व सोने, संपत्ती ठेवली; पण तुला काही पूर्ण होईना, मग देवी रुक्मिणीने फक्त तुळशीचे एक पान ठेवले आणि तुला पूर्ण झाली.

 

सुकलेल्या तुळशीच्या पानांचा उपाय

  1. धार्मिक मान्यतेनुसार तुळशीची सुकलेली पाने श्रीकृष्णाला प्रिय असतात. भगवान श्रीकृष्णाच्या नैव्यद्यत एक तुळशीचे पान 15 दिवस वापरता येते.
  2.  भगवान श्रीकृष्णाला अभिषेक करताना तुळशीची कोरडी पाने पाण्यात टाकता येतात. त्याचबरोबर तुळशीची वाळलेली पाने पाण्यात टाकूनही आंघोळ करू शकता. असे मानले जाते की यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
  3. हे सुद्धा वाचा
  4. ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची सुकलेली पाने लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवा. यामुळे माता  लक्ष्मीची कृपा कायम राहते. त्याची आर्थिक स्थिती सुधारते.
  5.  

    गंगाजलात तुळशीची कोरडी पाने टाकून घरात शिंपडा. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)