नवी दिल्ली : कोरोनामुळे (Corona) आणि खेळाडूंना बाधा झाल्याने बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पाठीमागील तीन दिवसांत अनेक खेळाडू आणि अधिकाऱ्यांचे कोरोना अहवाल सकारात्मक आढळले, त्यानंतर बायो बबलवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. आयपीएल पुढे ढकलल्यानंतर आता बायो बबल असतानाही कोरोनाची एन्ट्री कशी काय झाली, यामागील कारणांचा शोध बीसीसीआय घेत आहेत. अशातच पोलिसांनी दोन जणांना बेड्या ठोकल्याची बातमी समोर आली आहे. (2 bookies Arrested For Faking Accreditation cards during IPL 2021)
पोलिसांनी ज्या दोन जणांना अटक केलंय, ते बुकी आहेत. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दिल्लीत रविवारी दिल्लीत झालेल्या सामन्यादरम्यान त्यांनी अवैधरित्या मैदानाच घुसण्याचा प्रयत्न केला होता.आरोपींना पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठविण्यात आले आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, 2 मे रोजी झालेल्या सामन्यादरम्यान अरुण जेटली स्टेडियममध्ये 2 बुकींनी घुसण्याचा प्रयत्न केला, याबद्दल पोलिसांनी या बुकींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींजवळ प्रवेश मिळवण्यासंदर्भातला नकली पास आढळला होता. दोघांच्याहीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आयपीएलचे आयोजन बायो बबलमध्ये करण्यात आले होते आणि केवळ परवानगी असलेल्या लोकांनाच यात सहभागी होता येत होतं.
आयपीएल 2021 च्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 220 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करतावेळी सनरायझर्स हैदराबादचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 165 धावाच करु शकला. या सामन्यात राजस्थानने विजय मिळवला होता.
(2 bookies Arrested For Faking Accreditation cards during IPL 2021)
हे ही वाचा :
IPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी येऊ देणार की नाही?, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं स्पष्टीकरण
IPL 2021 : आयपीएल स्थगित, कोणकोणते विदेशी खेळाडू भारतात अडकलेत?, वाचा संपूर्ण यादी….
PHOTO | जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा कोरोनाच्या कचाट्यात, ‘इतके’ खेळाडू बाधित