मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी (IPL 2021) आता अवघे काही दिवस उरले आहेत. या 14 पर्वासाठी क्रिकेट टीमसह चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान या मोसमाआधी पुढील म्हणजेच 15 व्या हंगामांची (IPL 2022) चर्चा रंगू लागली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. 15 व्या मोसमात 2 संघ नव्याने (2 new teams) जोडले जाणार आहेत. त्यामुळे पुढील हंगामात 8 ऐवजी 10 टीम खेळताना दिसणार आहेत. याबाबतची माहिती बीसीसीआयच्या (bcci) एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिली. (2 new teams will play in the ipl 2022 auction will be held in May)
“आता 2 नव्या संघांचा समावेश होतोय. त्यामुळे या 2 टीमसाठीची बोली प्रक्रिया मे महिन्यात पार पडणार आहे. म्हणजेच आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या समारोपावेळेस या 2 संघांसाठीचा लिलाव होईल. सर्व औपाचारिकता पार पडल्यावर ते संघ आपल्या रणनितीची अंमलबजावणी करतील. त्यासाठी फार वेळ लागू शकतो”, अशी माहिती त्या अधिकाऱ्याने दिली.
आयपीएलमध्ये लवकरच 10 संघ खेळताना दिसतील, याबाबतची पूर्व कल्पना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने काही महिन्यांपूर्वीच दिली होती.
दरम्यान या नव्या संघाचे मालक कोण असणार हे जाणून घेण्याबाबत क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दरम्यान याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या 2 नव्या संघांचे मालकी हक्कासाठी अदानी ग्रुप आणि संजीव गोयंका ग्रुप यांची नावं आघाडीवर आहेत. तसेच या 2 टीमपैकी 1 टीमचं होम ग्राऊंड हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम असू शकते.
14 व्या हंगामाची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. या 14 व्या मोसमाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. 9 एप्रिल ते 30 मे पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. या मोसमातील सलामीचा सामना गत विजेच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येणार आहे. साखळी फेरीत एकूण 56 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व सामने अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे पार पडणार आहेत.
चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरुमध्ये प्रत्येकी 10-10 सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तर दिल्ली आणि अहमदाबादमध्ये प्रत्येकी 8-8 सामने खेळवण्यात पार पडणार आहेत.
संबंधित बातम्या :
IPL 2021 Time Table | आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून रंगणार थरार
(2 new teams will play in the ipl 2022 auction will be held in May)