मुंबई : टीम इंडियाचा (Indian Cricket Team) माजी खेळाडू सिक्सर किंग अर्थात युवराज सिंहचा (Yuvraj Singh Birthday) आज 39 वा वाढदिवस. आजच्याच दिवशी म्हणजेच 12 डिसेंबर 1981 मध्ये चंडीगढमध्ये युवराज सिंहचा जन्म झाला. युवराजला टीम इंडियाचा सिक्सर किंग म्हणून ओळखलं जातं. टीम इंडियाने 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकला. यामध्ये युवराजचे महत्वपूर्ण योगदान होते. युवराज सिंहच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील उल्लेखनीय कामगिरीवर आपण नजर टाकणार आहोत. 3 World Cup winning players 6 sixes off 6 balls 39th birthday of Sixer King Yuvraj Singh
402 intl. caps ?
11,778 intl. runs ?
2007 World T20-winner ?
Player of the Tournament in #TeamIndia's 2011 World Cup triumph ?
Fastest T20I 5⃣0⃣?Wishing the legendary & inspirational @YUVSTRONG12 a very happy birthday ??
Let's relive his remarkable ton vs England ??
— BCCI (@BCCI) December 12, 2020
19 सप्टेंबर 2007. वर्ल्ड कप टी 20 स्पर्धा (2007 T20 World Cup) टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामना खेळण्यात आला. हा सामना लक्षात नाही असा कोणताच भारतीय क्रिकेट चाहता नसेल. त्याचं कारणही तसंच आहे. या सामन्यात युवराजने एकाच ओव्हरमध्ये म्हणजेच 6 चेंडूत 6 सिक्स खेचण्याची कामगिरी केली. सामन्यादरम्यान एंड्रयू फ्लिंटॉफबरोबर मैदानात शाब्दिक युद्ध रगंलं. याचा राग युवराजने स्टुअर्ट ब्रॉडवर काढला. स्टुअर्टच्या गोलंदाजीवर युवराजने 6 चेंडूत 6 सिक्स लगावले. यानंतर युवराजला ‘सिक्सर किंग’ अशी ओळख मिळाली.
Best Left Hander Middle Order Batsmen & Part Time Bowler Of All Time In World Cricket…..Big Man In ICC Events 2000 , 2007 T20, 2011 WC ❤????
Happy Birthday King @YUVSTRONG12
??#HappyBirthdayYuvi pic.twitter.com/Lg7a4eeulY— Cinema Freak (@IamLucky509) December 11, 2020
युवराजने याच सामन्यात आणखी एक विक्रमी कामगिरी केली. युवराजने अवघ्या 12 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. युवराजने या सामन्यात 3 चौकार आणि 7 सिक्सच्या मदतीने 58 धावांची खेळी केली.
युवराजने 2011 मधील 50 ओव्हरच्या वर्ल्ड कपमध्ये अष्टपैलू कामगिरी केली. युवराजने वर्ल्ड कप 2011 च्या वर्ल्ड कप स्पर्धेचा हिरो ठरला होता. युवराजने या स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी केली. युवराजने या वर्ल्ड कपमध्ये एकूण 9 सामने खेळला. यामध्ये त्याने 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 362 धावा केल्या. 113 ही त्याची या स्पर्धेतील सर्वोच्च कामगिरी राहिली. तसेच गोलंदाजीनेही त्याने कमाल केली. युवराजने एकूण 9 सामन्यात 15 विकेट्स घेतल्या. 31 धावा देत 5 विकेट्स ही त्याची सर्वोच्च कामगिरी होती. त्याने ही कामगिरी आयर्लंड विरुद्ध केली होती. युवराजने केलेल्या या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला प्लेअर ऑफ द टोर्नामेंट या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
?️ Player of the Tournament in the 2011 @cricketworldcup
? 2007 @T20WorldCup champion
? First man to hit 6️⃣ sixes in an over in T20Is
? Fastest fifty in T20IsHappy birthday to the incredible @YUVSTRONG12 ? pic.twitter.com/VYqqPUMD0s
— ICC (@ICC) December 12, 2020
युवराजने टीम इंडियासाठी तब्बल 3 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकला आहे. टी 20 वर्ल्ड कप 2007 आणि वर्ल्ड कप 2011 या 2 स्पर्धा जिंकल्याचं आपल्याला माहिती आहे. पण या व्यतिरिक्त युवराजने टीम इंडियासाठी आणखी एक वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. युवराज अंडर 19 वर्ल्ड कप 2000 स्पर्धेचा विजयी संघाचा प्रतिनिधी होता. या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत मोहम्मद कैफ टीम इंडियाचं नेतत्व करत होता.
युवराजने टीम इंडियासाठी 304 एकदिवसीय, 58 टी 20 आणि 40 कसोटीमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये त्याने वनडेमध्ये 8 हजार 701, टी 20 मध्ये 1 हजार 177 तर कसोटीमध्ये 1 हजार 900 धावा केल्या आहेत. युवराजने 10 जून 2019 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
संबंधित बातम्या :
Ind Vs Aus : भारताविरुद्ध डे नाईट प्रॅक्टिस मॅचसाठी ऑस्ट्रेलिया A टीम घोषित, पाहा कोणाकोणाचा समावेश?
3 World Cup winning players 6 sixes off 6 balls 39th birthday of Sixer King Yuvraj Singh