आजच्या सराव सामन्यात टीम इंडियाच्या (Team India) फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे टीम इंडियाची चांगली धावसंख्या झाली होती. केएल राहूल (K L Rahul) आणि सुर्यकुमार यादव (Surykumar yadhav) या दोन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. दोघांनी आज मेलबर्नच्या मैदानात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीचं धुलाई केली. कोरोनाच्या आजारातून सावरलेल्या मोहम्मद शमीने आजच्या सराव सामन्यात चांगली गोलंदाजी केली.
आज विशेष म्हणजे सराव सामन्यात मोहम्मद शमीला संधी देण्यात आली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची आज खरी कसोटी होती. परंतु त्याने चार चेंडूत चार विकेट घेतल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहे.
सोशल मीडियाव मोहम्मद शम्मीचे सगळे कौतुक करीत आहेत. मुळात मोहम्मद शमीने ही कामगिरी शेवटच्या ओव्हरमध्ये केली आहे. चार बॉलमध्ये चार विकेट घेतल्यामुळे टीममधील खेळाडू सुद्धा खूष आहेत.
शेवटच्या ओव्हरमध्ये 11 धावांची ऑस्ट्रेलियाला गरज होती. परंतु शमीने भेदक मारा केल्याने टीम इंडिया विजयी झाली.
पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाने 186 धावाचं आवाहन ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं होतं
2,2,W,W,W,W by Shami in the 20th over while defending 11 runs.
— Johns. (@CricCrazyJohns) October 17, 2022
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलियन टीम
अॅरॉन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा .