मेलबर्न : ऑस्ट्रेलियाच्या (Australia) हवामान खात्याने पाऊस पडणार असल्याची माहिती जाहीर केल्यापासून चाहते निराश आहेत. कारण येत्या रविवारी टीम इंडियाची (Team India) पाकिस्तानविरुद्ध (IND VS PAK) मेलबर्नमध्ये मॅच होणार आहे. आजपासून सलग तीन दिवस पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने जाहीर केली आहे.
जगभरातल्या चाहत्यांना टीम इंडिया आणि पाकिस्तानच्या मॅचची आतुरता लागली आहे. त्यामुळे समजा पाऊस आला मॅच किती ओव्हर खेळवायची हा निर्णय आयसीसी बोर्ड घेणार आहे. विशेष म्हणजे मैदान मॅच खेळण्यासाठी तयार असेल तर तो निर्णय घेण्यात येणार आहे.
Weather forecast for Sunday in Melbourne. Not great but looks a lot better than it did a few days ago for India v Pakistan. #T20WorldCup pic.twitter.com/7s9my7t4Jf
— Andrew Wu (@wutube) October 20, 2022
शेवटच्या दहा ओव्हरचा खेळ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे एका टीम पाच ओव्हर खेळायला मिळतील.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.