Nz vs Pak semifinal: पाकिस्तानच्या विजयानंतर सोशल मीडियावर मजेशीर मीम्सचा पूर, जाफरनेही मारला “षटकार”

| Updated on: Nov 10, 2022 | 8:39 AM

आज सेमीफायनलमधील दुसरी मॅच एडलेडच्या मैदानावर होणार आहे.

Nz vs Pak semifinal: पाकिस्तानच्या विजयानंतर सोशल मीडियावर मजेशीर मीम्सचा पूर, जाफरनेही मारला षटकार
Wasim Jaffer
Image Credit source: twitter
Follow us on

नवी दिल्ली : विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) सेमीफायनलच्या मॅच सुरु आहेत. कालच्या पहिली मॅच न्यूझिलंडविरुद्ध (NZ) पाकिस्तान (PAK) अशी होती. कालच्या झालेल्या मॅचमध्ये पाकिस्तान टीमने न्यूझिलंड टीमचा पराभव केला. तेव्हापासून सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे. सोशल मीडियावर पाकिस्तान टीम आणि खेळाडूंच्या नावाने अनेक मीम्स तयार करण्यात आले आहेत. चाहते ते मीम्स व्हायरल करुन मजा घेत आहेत. त्यामध्ये टीम इंडियाचा माजी खेळाडू वसिम जाफरने सुद्धा षटकार लगावला आहे.

आज सेमीफायनलमधील दुसरी मॅच एडलेडच्या मैदानावर होणार आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातला महामुकाबला चाहत्यांना दुपारी दीड वाजल्यापासून पाहता येणार आहे. टीम इंडियाचे अनेक खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने इंग्लंड पुढे त्यांना रोखण्याचं मोठं आवाहन असणार आहे. सुर्यकुमार यादवला रोखण्यासाठी इंग्लंड टीमची काल स्पेशल बैठक झाली.

हे सुद्धा वाचा