मुंबई : टीम इंडियाचा (Team India) पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. सेमीफायनच्या महत्त्वाच्या मॅचमध्ये गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी खराब कामगिरी केली. त्यामुळे टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं. सोशल मीडियावर (Social Media) टीम इंडियातील खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना काढून टाका अशी मागणी चाहत्यांनी बीसीसीआयकडे (BCCI) केली आहे. विशेष म्हणजे माजी भारतीय निवड समितीच्या कर्मचाऱ्यानेपराभवाचे धक्कादायक कारण सांगितले आहे.
माजी भारतीय निवड समितीचे सरनदीप सिंह यांनी टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर एक कारण सांगितलं. ते म्हणतात की युजवेंद्र चहल या टीममध्ये संधी द्यायची नव्हती, तर त्याला ऑस्ट्रेलियाला का घेऊन गेले होते. तसेच त्याला टीममध्ये संधी न दिल्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला.
ऋषभ पंतला सुद्धा टीम इंडियाने कमी मॅचमध्ये संधी दिली. त्याला सुद्धा संधी द्यायला हवी होती. टीम इंडियामध्ये मोठा बदल होणार आहे. सध्याच्या टीम इंडियामधून अनेक खेळाडूंना बाहेर रस्ता मिळणार आहे.
कालच्या सामन्यात इंग्लंडच्या टीमने चांगली फलंदाजी केली, त्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला. रविवारी पाकिस्तान आणि इंग्लंड याच्यात विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे.