बकऱ्या चारताना क्रिकेट खेळताना मारलेल्या अप्रतिम षटकारांच्या व्हायरल व्हीडिओने जीवनच बदलून टाकलं

| Updated on: Feb 16, 2023 | 11:35 PM

राजस्थानमधील एका 14 वर्षाच्या लेडी सूर्यकुमारचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनेही याची दखल घेतली होती.

बकऱ्या चारताना क्रिकेट खेळताना मारलेल्या अप्रतिम षटकारांच्या व्हायरल व्हीडिओने जीवनच बदलून टाकलं
Follow us on

मुंबई : राजस्थानमधील एका 14 वर्षाच्या लेडी सूर्यकुमारचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. बारमेर जिल्ह्यातील शिव येथील शेरपुरा कानासर गावातील लहान मुलगी चौफेर फटकेबाजी करताना दिसली होती. या लहान मुलीचा व्हिडीओ इतका व्हायरल झाला होता की थेट क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनेही याची दखल घेतली होती. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी तिच्या बॅटींगचं कौतुक केलं होतं. या मुलीची दखल स्थानिक पातळीवर घेतलेली दिसत आहे.

लेडी सूर्यकुमार मुमल मेहेरला रुमा देवी यांनी शिष्यवृत्ती देऊन गौरवलं आहे. या शिष्यवृत्तीमध्ये प्रत्येक वर्षाला मुमल मेहेरला  25 हजारांची रक्कम मिळणार आहे. मुमल मेहेरची चुलत बहीण अनिसा बानो अक्षरा शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत आहे.

मूमलला पाहून ग्रामीण भागातील इतर मुलींनासुद्धा प्रोत्साहन मिळेल. मूमलची बहिण अनिशाला पाहूनच क्रिकेटचे धडे घेत आहे. आता मूमलच्या व्हायर झालेल्या व्हिडीओमुळे इतर मुलीही पुढे येतील, असं रुमा देवी म्हणाल्या.

मूमल इयत्ता आठवीमध्ये शिकत असून तिची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. तिच्याकडे खेळण्यासाठी साधे बूट नाहीत आणि घराचं बांधकामही अर्धवट आहे. मूमलचा हा व्हिडीओ सचिनने ट्विट केला असून खास कॅप्शनही दिलं होतं. सचिन तेंडुलकरनेही या मुलीच्या फलंदाजीचे कौतुक केले. मुमल मेहेरचा व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिलं की, ‘लिलाव कालच झाला आणि आज सामनाही सुरू झाला?. खरंच बॅटींग पाहून आनंद झाला.

मुलीला क्रिकेटच चांगलं प्रशिक्षण देता येईल, इतकं या कुटुंबाचं उत्त्पन नाहीय. सध्या शाळेतील शिक्षक रोशन खान मूमलचे कोच आहेत. जे तिला क्रिकेटचे बारकावे शिकवतायत. रोशन खान दररोज तीन ते चार तास मूमलकडून क्रिकेटची प्रॅक्टिस करुन घेतात.

दरम्यान, क्रिकेट खेळण्याबरोबरच मूमलला घरच्या कामकाजात आईला मदत करावी लागते. ती बकऱ्या चरण्यासाठी घेऊन जाते. मात्र एवढ सगळं करुनही मूमलने तिची क्रिकेटची आवड जपलीय.