एखाद्या क्रिकेट खेळाडूने आपली निवृत्ती (Retirement) जाहीर केल्यानंतर सगळ्यात अवघड असतं ते चाहत्यांचं, काल अचानक ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच (Aaron Finch) याने रविवारी एकदिवसीय क्रिकेटमधील शेवटचा सामना खेळणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पुन्हा सोशल मीडियावर (Social Media) चर्चा सुरु झाली. सध्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय सामने सुरु आहे. सध्या संघाचं कर्णधार पद अॅरोन फिंच यांच्याकडे आहे. त्याचबरोबर पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात फिंच ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.
Aaron Finch. What a sensational ODI career! ⭐️ pic.twitter.com/2dAiUch8Cs
हे सुद्धा वाचा— cricket.com.au (@cricketcomau) September 10, 2022
सध्या ऑस्टेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच 36 वर्षाचा आहे. अचानक क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याने आत्तापर्यंत त्याच्या कारर्कीदीत 145 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 5401 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याची धडाकेबाज फलंदाजी असल्यामुळे त्याने आत्तापर्यंत 17 शतके झळकावली आहेत.
⭐️ 145 ODIs
⭐️ 5401 runs
⭐️ 17 centuries
⭐️ 2020 Aus men’s ODI Player of the Year
⭐️ 2015 World Cup winner https://t.co/60KYlfwhMq— Cricket Australia (@CricketAus) September 9, 2022
धडाकेबाज फलंदाज म्हणून अॅरोन फिंच याने आपलं नाव कमावलं होतं. त्याचे जगभरात चाहते आहेत. आयपीएलमध्ये सुद्धा त्याने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याचे भारतात सुद्धा चाहते आहेत.
पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक होणार आहे. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाचं कर्णधार पदं त्यांच्या असणार आहे. ज्यावेळी 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता, त्यावेळी तो ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. याशिवाय 2020 मध्ये त्याला ऑस्ट्रेलियाचा ‘मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कारही मिळाला आहे.