AB De Villiers Birthday | 59 मिनिटात 25 चेंडूत 132 धावा, जेव्हा धोनी-कोहलीच्या मैदानात गाजलं एबीडीचं नाव

| Updated on: Feb 17, 2021 | 10:31 AM

या खेळाडूने फक्त क्रिकेटमध्येच नाही तर गोल्फ, टेनिस आणि रग्बी सारख्या खेळातही कमाल केली आहे.

AB De Villiers Birthday | 59 मिनिटात 25 चेंडूत 132 धावा, जेव्हा धोनी-कोहलीच्या मैदानात गाजलं एबीडीचं नाव
AB De Villiers
Follow us on

मुंबई : जगातील काही लोक असे असतात जे कुठलंही काम करण्यात पारंगत असतात (AB De Villiers Birthday Special). तसेच, ते या कामाला इतकं सोपं बनवतात की ते बघणाऱ्यांना विश्वास करणं कठीण होतं. क्रिकेटच्या जगातही असा एक खेळाडू आहे जो मैदानैत उतरताच लोकांची दातखीळ बसते. तो असे शॉट लावतो ज्यांना बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का लागतो. जेव्हा तो फिल्डिंग करतो तेव्हा अशा प्रकारे कॅच पकडतो की जणू सुपरमॅनचं मैदानात उतरला आहे (AB De Villiers Birthday Special).

या खेळाडूने फक्त क्रिकेटमध्येच नाही तर गोल्फ, टेनिस आणि रग्बी सारख्या खेळातही कमाल केली आहे. 21 वर्षांच्या वयात या खेळाडूला देशाचं भविष्य म्हटलं जात होतं. या खेळाडूचं नाव अब्रामह बेंजामिन डिविलियर्स (Abraham Benjamin De Villiers) आहे. याला सारं जग एबीडीच्या नावाने ओळखते. 1983 मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे 17 फेब्रुवारीला त्याचा जन्म झाला होता.

AB De Villiers

क्रिकेटबाबत बोलायचं झालं तर संपूर्ण पुस्तक एबीडीच्या चमत्कारांनी भरलेलं असेल. वर्ष 2004 मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण, क्रिकेटच्या फलकावर येण्यास जरा वेळ लागला. 2008 मध्ये एबीडीच्या बॅटचा चमत्कार सर्वांनी पाहिला. त्याने पहिले भारताविरोधात दुहेरी शतक लावला.

हेडिंग्ले टेस्टमध्ये 174 आणि पर्थमध्ये नाबाद 106 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरीज जिंकवली. 2010 मध्ये पाकिस्तानविरोधात नाबाद 278 धावा केल्या आणि गॅरी कर्स्टनच्या रेकॉर्डला तोडलं.

AB De Villiers

31 चेंडून शतक

2015 मध्ये या फलंदाजाने एक आश्चर्यकारक कारनामा केला. वेस्ट इंडिजविरोधात अवघ्या 31 चेंडूत एक दिवसीय शतक ठोकलं. यामध्ये त्याने 44 चेंडूत 149 धावा केल्या. सर्वात वेगवान अर्धशतक आणि शतक ठोकलेल्या एबीडीने सर्वात वेगवान 150 धावा करण्यापासून चुकला. एबीडीने फक्त 25 चेंडूत 132 धावा केल्या. या धावा एबीडीने 9 चौकार आणि रेकॉर्ड 16 षटकारच्या मदतीने बनवले. त्याचा स्ट्राईक रेट 338.64 होता.

काही महिन्यांनंतर विश्वचषकात त्याने फक्त 66 चेंडूत 162 धावा केल्या. त्यासोबतच सर्वात वेगवेन 150 धावांचा रेकॉर्ड आपल्या नावे केला. पण, दक्षिण आफ्रिका सेमीफायनलपर्यंतच पोहोचू शकला, फायनलमध्ये नाही पोहोचला. यावेळी एबीडीला अश्रू अनावर झाले आणि संपूर्ण जगाने सुपरमॅनला रडताना पाहिले.

AB De Villiers

मिस्टर 360 डिग्री

एबीडीला 360 डिग्री फलंदाज म्हटलं जातं. कारण, तो मैदानात कुठल्याही चेंडूवर कुठेही कुठल्याही पद्धतीने कुठल्याही गोलंदाजाला मोठा शॉट मारु शकतो. गोलंदाजांना एबीडीसमोर चेंडू टाकताना मनोबल वाढवावं लागतं. त्यांची फलंदाजी इतकी जबरदस्त असते हे त्यांच्या संघाचे गोलंदाजही सांगू शकतात. एबीडीने आईपीएलच्या एका मॅचमध्ये देशाच्या महान गोलंदाज डेल स्टेनलाही जबरदस्त धावा ठोकल्या होत्या. त्यांनी एका ओव्हरमध्ये 23 धावा केल्या होत्या (AB De Villiers Birthday Special).

जेव्हा धोनी-कोहलीसमोर एबीडी-एबीडीच्या घोषणांनी मैदान गाजलं

एबीडीचे चाहते संपूर्ण जगात आहेत. वर्ष 2015 मध्ये दक्षिण आफ्रिका वनडे सिरीजसाठी भारतात आली होती. मुंबईमध्ये मॅच दरम्यान एबीडीने भारतीय गोलंदाजांना चांगलंच थकवलं. पहिले क्विंटन डिकॉक आणि मग फाफ डु प्लेसीने शतक ठोकलं. मात्र, एबीडीने या मॅचमध्ये 61 चेंडूत तीन चौकार आणि 11 षटकारांच्या मदतीने 119 दावा ठोकल्या. तेव्हा संपूर्ण वानखेडे स्टेडिअम ‘एबीडी, एबीडी’च्या नावाने गाजलं. या मॅचमध्ये एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा सारखे भारतीय संघातील सुपरस्टार खेळाडू खेळत होते. हा सामना भारताने 214 धावांनी गमावला.

AB De Villiers Birthday Special

संबंधित बातम्या :

1000 पेक्षा अधिक विकेट्स, एका डावात 10 बळी, चायनामॅन बोलचा अविष्कार करणाऱ्या अवलियाचा जन्मदिन

Kieron Pollard | आयपीएलच्या 14 व्या मोसमाआधी कायरन पोलार्डचा धमाका, अवघ्या 3 ओव्हरमध्ये 5 विकेट्स

नागालँडचा एकलव्य, शेन वॉर्नचे व्हिडीओ पाहून फिरकी शिकला, आता आयपीएल गाजवण्यासाठी सज्ज