मुंबई: इंडियन प्रीमिअर लीग (IPL) आता कुठे रंगात येत असतानाच भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे एक-एक खेळाडू मायदेशी परतायला सुरुवात झाली आहे. यामध्ये आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) दोन खेळाडुंची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झम्पा आणि केन रिचडर्सन या दोघांनी आयपीएल स्पर्धा मध्येच सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. (Adam Zampa Kane Richardson join Andrew Tye in withdrawing from IPL 2021)
या दोघांनी वैयक्तिक कारण असल्याचे सांगत आयपीएलमधून माघार घेत असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच राजस्थान रॉयल्सच्या संघात असणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू टाय यानेही IPL 2021 स्पर्धेतून माघार घेतली होती. भारतात कोरोनाचा प्रकोप आणखी वाढल्यास आपल्याला ऑस्ट्रेलियाचे दरवाजे बंद होऊ शकतात, अशी भीती या खेळाडूंना असल्याचे सांगितले जाते. रॉयल्स चॅलेंजर्सने अॅडम झम्पाला 1.5 कोटी तर केन रिचडर्सनला 4 कोटी रुपये मोजून खरेदी केले होते.
दोन दिवसांपूर्वी बायो बबलला कंटाळून राजस्थानचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन हादेखील माघारी परतला होता. बायो-बबलमध्ये मानसिक कोंडमारा होत असल्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्याने सांगितले होते.
इंग्लंडच्या संघाने गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन बिग बॅश लीगमध्ये खेळला होता. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून लियाम लिव्हिंगस्टोन हा बायो बबलमध्ये होता. बायो बबलमुळे जोश हॅझलवूड (चेन्नई), जोशुआ फिलीप (रॉयल चॅलेंजर्स), मिशेल मार्श (हैदराबाद) या खेळाडुंनी आयपीएल सुरु होण्यापूर्वीच स्पर्धेला रामराम ठोकला होता.
आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) धूम सुरु असताना चेन्नईच्या (Chennai Super Kings) संघासाठी आणि पाठीराख्यांसाठी एक दु:खद बातमी आहे. चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेडचे संचालक आणि अध्यक्ष एल. सबारत्नम (L Sabaratnam) यांचे दीर्घ आजाराने रविवारी चेन्नई येथे निधन झाले. बंगळुरुविरुद्ध (CSK vs RSB) विजय मिळवल्यानंतर चेन्नईसाठी आनंदाचा दिवस होता मात्र एल सबारत्नम यांच्या निधनानंतर चेन्नईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सबारत्नम बराच काळ चेट्टीनाड सिमेंट कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक होते. याआधी ते चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे संचालक देखील होते. इतकेच नव्हे तर ते इंडिया सिमेंट्सचे सल्लागार आणि कोरोमंडल शुगर्सचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देखील होते.
संबंधित बातम्या:
IPL 2021 : ‘जिसे डरते थे, वहीं बात हो गयी’, चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला ‘डबल धक्का’!
IPL 2021 : चेन्नईविरुद्धची मॅच हारल्यानंतरही विराट कोहली भलताच खूश, म्हणतो, ‘सर जाडेजा इज ग्रेट…!’
(Adam Zampa Kane Richardson join Andrew Tye in withdrawing from IPL 2021)