नवी दिल्ली : अफगाणिस्तानच्या 19 वर्षीय युवा फलंदाजाने धडाकेबाज खेळी केलीय. रहमानुल्लाह गुरबाजने (Rahmanullah Gurbaz) झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी ट्वेन्टीत (Afganistan vs Zimbabwe) 45 चेंडूत 87 रन्सची धमाकेदार खेळी केलीय. त्याच्या या विस्फोटक खेळीत त्याने 6 चौकार तर 7 गगनचुंबी षटकार लगावले. 45 चेंडू खेळलेल्या गुरबाजने झिम्बावेच्या गोलंदाजाची यथेच्छ धुलाई केली. (Afganistan Rahmanullah Gurbaz 87 Runs Against Zimbabwe)
गुरबाजच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर निर्धारित 20 ओव्हरमध्ये अफगानिस्तानने 198 धावा केल्या. अफगानिस्तानचा कर्णधार असगर अफगान 38 चेंडूत 55 रन्स धावा ठोकल्या. ज्यामध्ये 6 चौकार आणि 2 षटकार लगावले. गुरबाज आणि असगरच्या बॅटिंगच्या जोरावर अफगानिस्तानने 198 रन्स केले.
गुरबाजने 87 रन्स करताना एक खास रेकॉर्ड बनविला. गुरबाजने टी 20 इंटरनॅशनलमध्ये अफगाणिस्तानकडून एका मॅचमध्ये सर्वांत जास्त रन्स करणारा दूसरा विकेटकीपर बॅट्समन बनला आहे. अफगाणिस्तानकडून टी 20 मध्ये विकेट कीपर फलंदाजांच्या यादीत सगळ्यात जास्त रन्स करणारा फलंदाज म्हणून मोहम्मह शहजाद ओळखला जातो. शहजादने 2016 ला जिम्बाब्वेविरुद्ध 118 रन्स धावा केल्या होत्या.
गुरबाजने ची 20 मध्ये तिसरं अर्धशतक झळकावलं. त्याने पहिल्या 26 चेंडूत 50 धावा फटकावल्या. या 87 धावा करताना त्याने मैदानाच्या चारही कोपऱ्यात फटके मारले. वनडे मॅचमध्ये डेब्यु करताना गुरबाजने तडाखेबाज शतक ठोकलं होतं.
(Afganistan Rahmanullah Gurbaz 87 Runs Against Zimbabwe)
हे ही वाचा :
देशाला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी 39 वर्षीय खेळाडू मैदानात, निवृत्तीच्या 5 वर्षांनी पुनरागमन