Asia cup 2022 : अफगाणिस्तानच्या चाहत्यांची पाकिस्तानच्या चाहत्यांना मारहाण, भारतीयांची गळाभेट

| Updated on: Sep 09, 2022 | 5:27 PM

डान्स चिडवण्यासारखा असल्यामुळे सामना संपल्यानंतर संतप्त झालेल्या अफगाण चाहत्यांनी पाकिस्तानच्या चाहत्यांना बेदम मारहाण

Asia cup 2022 : अफगाणिस्तानच्या चाहत्यांची पाकिस्तानच्या चाहत्यांना मारहाण, भारतीयांची गळाभेट
अफगाणिस्तानच्या चाहत्यांची पाकिस्तानच्या चाहत्यांना मारहाण, भारतीयांची गळाभेट
Image Credit source: twitter
Follow us on

आशिया चषक (Asia cup 2022) कोण जिंकणार याची चर्चा आत्तापासून सुरु झाली आहे. हा सामना श्रीलंका (Shrilanka)आणि पाकिस्तान (pakistan) यांच्यात होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आत्तापासून चर्चा सुरु झाली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात रोमांचक सामना झाला त्यावेळी पाकिस्तानच्या प्रेक्षकांना अफगाण प्रेक्षकांनी बेदम मारहाण केली.


एक अंकल डान्स करीत होता. त्यांचा डान्स चिडवण्यासारखा असल्यामुळे सामना संपल्यानंतर संतप्त झालेल्या अफगाण चाहत्यांनी पाकिस्तानच्या चाहत्यांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर शोएब अख्तर याने चाहत्यांना क्रिकेटला समजून घ्यावं असा सल्ला दिला आहे.

काल ज्यावेळी टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यात मॅच झाली. त्यावेळी दोन्हीकडील चाहत्यांनी आपल्या संघाला सपोर्ट केला. त्याचबरोबर एकत्र इन्जॉय केला. त्यानंतर मॅच संपल्यानंतर चाहत्यांनी एकत्र गळाभेेट घेतली असल्याचे व्हायरल व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.