Virat Kohli : काल महासेलिब्रेशन अन् आज अचानक विराट लंडनला, चर्चांना उधाण, एअरपोर्टवर दिसला…

| Updated on: Jul 05, 2024 | 9:48 AM

टी20 वर्ल्ड कप जिंकल्यावर मुंबईतील सेलिब्रेशननंतर विराट कोहली अचानक लंडनला रवाना झाला आहे. एअरपोर्टवर त्याचा कूल लूक दिसला. कोहलीचे कुटुंब सध्या लंडनमध्ये असून त्यांच्यासोबत हा विजय साजरा करण्यासाठी तो उत्सुक आहे.

Virat Kohli : काल महासेलिब्रेशन अन् आज अचानक विराट लंडनला, चर्चांना उधाण, एअरपोर्टवर दिसला...
Image Credit source: social media
Follow us on

टी20 वर्ल्ड कप जिंकल्यावर गुरूवारी भारतीय संघ मायदेशी परतला. आधी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर मुंबईत या संघाची व्हिक्टरी परेड झाली. वानखेडेवर लाखो चाहत्यांच्या उपस्थितीत सर्व खेळाडूंनी पुन्हा सेलीब्रेशन केले. या सेलिब्रेशननंतर सर्व खेळाडू आपापल्या घरी गेले, मात्र भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली हा अचानक लंडनला रवाना झाला आहे. गुरूवारी रात्री एअरपोर्टवर विराट कूल लूकमध्ये दिसला. पत्नी अनुष्का शर्मा आणि वामिका- अकाय या दोन्ही मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी, त्यांच्या भेटीसाठी विराट मुंबईहून लागलीच लंडनला रवाना झाला.

गुरुवारी रात्री विराट मुंबई विमानतळावर पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. रिपोर्ट्सनुसार, तो ब्रिटनच्या दिशेने रवाना झाला. एअरपोर्टवर विराट ऑलिव्ह ग्रीन कलरच्या जॅकेटमध्ये तो खूपच आकर्षक दिसत होता. त्यासोबत त्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि क्रीम कलरची पँट परिधान केली होती.

कुटुंबियांच्या भेटीसाठी आतूर विराट

बार्बाडोसमध्ये भारताने जेव्हा टी-20 विश्वचषक जिंकला तेव्हा विराट कोहलीचे कुटुंब तेथे उपस्थित नव्हते. रोहित शर्माने मैदानावर उपस्थित त्याची पत्नी रितिका सजदेहसोबत हा आनंदाचा क्षण शेअर केला, तर जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनही तेथे उपस्थित होती. पण कोहलीला हा आनंद कुटुंबासोबत फक्त फोनवरच शेअर करता आला. मैदानावरूनच त्याने कुटुंबियांशी संवाद साधला. त्यावेळी इमोशनल झालेला विराट, आपल्या कुटुंबाला किती मिस करत होता हे स्पष्ट दिसत होते.

बार्बाडोसमधील चक्रीवादळामुळे भारतीय संघाला मायदेशी परतण्यास उशीर झाल्याने कोहलीला त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यास आणखी विलंब झाला. वेळापत्रकानुसार टीम इंडिया 1 जुलैला परतणार होती, मात्र या वादळामुळे टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली होती. अखेर 4 जुलैला भारतीय संघ मायदेशी परतला.

 

भारतात परतल्यानंतरही टीम इंडियाचे वेळापत्रक ठरलेले होते. प्रथम खेळाडूंनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्यानंतर मुंबईत ग्रँड सेलीब्रेशन केले. ही सगळी धामधूम संपताच कोहलीने कोहलीने क्षणाचाही विलंब केला नाही आणि तो पत्नी-मुलांची भेट घेण्यासाठी तातडीने लंडनला रवाना झाला.

विराटने पत्नी अनुष्काला व्हिडिओ कॉलवर दाखवली चक्रीवादळाची भीषणता

विराट कोहली आणि भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये अडकला होता. चक्रीवादळामुळे हॉटेलमधून बाहेर पडणेही शक्य नव्हते. त्यामुळे खेळाडू गप्पांमध्ये आणि कुटुंबाशी संवाद साधण्यात वेळ घालवला. विराट कोहलीने अनिष्काला व्हिडिओ कॉल लावला. त्या माध्यमातून चक्रीवादळाची भीषणता तिला दाखवली. हॉटेलच्या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाऊन किती वेगाने वारे वाहत आहे, ते विराटने दाखवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.