टीम इंडियाचा महेंद्रसिंग धोनी (Mahendrasigh Dhoni) हा यशस्वी कर्णधार (Captain) आहे असं अनेकदा म्हटलं जातं. कारण त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारर्कीदीत त्याने अनेक मालिका जिंकल्या आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाला त्याने टी 20 मधील विश्वचषक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 50 ओव्हरमधील विश्वचषक जिंकून दिला आहे. त्यामुळे धोनीची आजही सोशल मीडियावर (Social Media) त्याचे चाहते चर्चा करीत असतात.
धोनी अजूनही देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे त्याचे चाहते सु्द्धा अधिक आहेत. काल महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देव या दोन यशस्वी कर्णधारांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यावर अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. विशेष म्हणजे रणवीर कपूरने सुद्धा एक कमेंट केली असून चाहत्यांनी रणवीर कमेंटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.
महेंद्रसिंग धोनीने आत्तापर्यंत क्रिकेटचे मैदान गाजवले आहे. काल तो गोफ्टच्या मैदानात दिसला. तिथं सुद्धा त्याने चांगले शॉट्स खेळले आहेत. त्यामुळे तिथले अधिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मागच्या काही दिवसांपुर्वी धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला होता. कारणही तसंच होतं कारण त्याने एका बिस्कीटाचं लॉचिंग केलं होतं. त्यावेळी त्याने ज्यावेळी विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी सुद्धा या बिस्कीटाचं लॉचिंग केलं होतं असं वक्तव्य केलं होतं. त्यावर चाहत्यांनी धोनीला ट्रोलिंग केलं.