मेलबर्न : टीम इंडियाची (Team India) आणि पाकिस्तानची (Pakistan) काल मेलबर्नच्या मैदानात रोमांचक मॅच झाली. कालच्या सामन्यावरती हवामान खात्याने पावसाचं सावट व्यक्त केलं होतं. परंतु तिथं काल विराट कोहली (Virat Kohli) आणि हार्दीक पांड्याने धावांचा पाऊस पाडला. पाकिस्तानच्या गोलंदाजांची विराट कोहली आणि पांड्याने चांगली धुलाई केली. पाकिस्तान खेळाडूंनी अनेक चुका केल्याने टीम इंडियाचा विजय झाला.
“We win as one and lose as one!”
हे सुद्धा वाचाListen what Matthew Hayden, Babar Azam and Saqlain Mushtaq told their players following a heartbreaking loss in Melbourne.#T20WorldCup | #WeHaveWeWill pic.twitter.com/suxGf34YSe
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 23, 2022
पाकिस्तानच्या खेळाडूंनी अनेक चुका केल्याने चाहते निराश झाले आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियावर खेळाडूंवर जोरदार टीका केली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने तात्काळ खेळाडूंना समजून सांगितलं आहे. हा आपला सुरुवातीचा सामना होता. मी कोणाला एकट्याला दोष देणार नाही.
पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद सिराजला पराभवानंतर ड्रेसिंग रुममध्ये बाबर आझमने समजावून सांगितलं की, तूझ्या एकट्यामुळे मॅच हारली नाही. टीम मधले सगळे खेळाडू पराभवाला जबाबदार आहेत. त्यामुळे एकट्याला कोणी दोष देणार नाही. त्याने आत्तापर्यंत अनेक चांगल्या मॅचेस जिंकून दिल्या आहेत.
यापुढे अनेक मॅचेस मोठ्या टीमसोबत होणार आहेत. तसेच यापुढे आपल्याला चांगली कामगिरी करायची आहे. सगळ्यांनी झालेला पराभव विसरुन चांगली कामगिरी करायची आहे असा सल्ला बाबर आझमने पाकिस्तानच्या खेळाडूंना दिला.