T20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर वेस्ट इंडिजच्या संघात होणार मोठा बदल

| Updated on: Nov 21, 2022 | 9:11 PM

निकोलस पूरन या खेळाडूला वेस्ट इंडिज टीमचे नेतृत्व देण्यात आले होते.

T20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर वेस्ट इंडिजच्या संघात होणार मोठा बदल
T20 World cup 2022
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : T20 विश्वचषकात (T20 World cup 2022) खराब कामगिरी केल्यापासून वेस्ट इंडिज (west Indies) टीममध्ये मोठा बदल होणार असल्याचे संकेत वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डने दिले होते. त्यानुसार वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने खेळाडूंची चौकशी करण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी तीन दिग्गज खेळाडूंची समिती नेमण्यात आली होती. वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू शिवनारायण चंद्रपॉल (shivnarine chanderpaul) याने खेळाडूंवर पैशासाठी आयपीएल खेळतात असा आरोप केला होता. पण आम्ही देशासाठी क्रिकेट खेळलो आहे, असंही त्याने स्पष्ट केलं होतं.

निकोलस पूरन या खेळाडूला वेस्ट इंडिज टीमचे नेतृत्व देण्यात आले होते. परंतु विश्वचषक स्पर्धेत निराशजनक कामगिरी केली, छोट्या टीमकडून वेस्ट इंडिज टीमचा पराभव झाला. त्यानंतर जगभरातील क्रिकेटच्या चाहत्यांनी वेस्ट इंडिज टीमवरती टीका केली. काही माजी खेळाडूंनी सुद्धा जोरदार टीका केली. त्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने त्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला.

रोवमैन पावेल याच्याकडे T20 टीमचं कर्णधार पद देण्याची शक्यता आहे. कारण त्याने वेस्ट इंडिजमध्ये होत असलेल्या T20 फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तसेच त्याने आतापर्यंत T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सुद्धा चांगली कामगिरी केली आहे.

हे सुद्धा वाचा

स्कॉटलॅंड आणि आयरलॅंड या छोट्या टीमकडून वेस्ट इंडिज टीमचा पराभव झाल्यानंतर वेस्ट इंडिजच्या चाहत्यांनी निवड समितीसह वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डला अनेक प्रश्न केले होते.