Team India : विराटला जे आवडतं तेच… छोले भटुरेपासून ते… टीम इंडियाच्या नाश्त्याचा मेनू व्हायरल

| Updated on: Jul 04, 2024 | 9:21 AM

टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडिया अखेर 15 तासांच्या प्रवासानंतर भारतात पोहोचली आहे. दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत झाल्यानंतर टीम इंडिया आयटीसी मौर्य या हॉटेलमध्ये पोहचले आहेत. हॉटेलच्या शेफ्सनी टीम इंडियासाठी खास ब्रेकफास्ट तयार केला आहे. त्यामध्ये खेळाडूंची आवड लक्षात घेण्यात आली आहेच पण त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊनच हे पदार्थ बनवण्यात आले आहेत. टीम इंडियासाठी काय असेल खास मेन्यू ?

Team India : विराटला जे आवडतं तेच... छोले भटुरेपासून ते... टीम इंडियाच्या नाश्त्याचा मेनू व्हायरल
Follow us on

टी 20 वर्ल्ड कप वर नाव कोरल्यानंतर भारतात जल्लोष झालाच पण जगभरातही क्रिकेटप्रेमी खूप खुश झाले. शनिवारी झालेल्या सामन्यानंतर भारतीय संघ चक्रीवादळामुळे बार्बाडोसमध्येच अडकला होता. मात्र अखेर आज स्पेशल विमानाने चँपियन टीम भारतात दाखल झाली असून ते राजधानी दिल्लीतील हॉटेल आयटीसी मौर्यमध्ये उतरले आहेत. त्यानंतर थोड्या वेळाने ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. तर आज संध्याकाळी मुंबईत ओपन बसमधून टीम इंडियाची विजयी रॅली होणार आहे. खुद्द टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने याबद्दल ट्विट केले होते. मात्र मुंबईत येण्यापूर्वी हे खेळाडू काही राजधानी दिल्लीतच थांबणार असून आयटीसी मौर्य हॉटलेच्या शेफ्सनी विजयी खेळाडूंच्या ब्रेकफास्टसाठी खास मेन्यू तयार केला आहे. त्यामध्ये खेळाडूंची आवड घेऊन काही पदार्थ बनवण्यात आले आहेतच पण त्यांच्या तब्येतीची काळजीही घेण्यात आली आहे. टीम इंडियासाठी काय खास मेन्यू असेल ?

आम्ही जागतिक चॅम्पियन संघासाठी खास नाश्ता तयार केला आहे. हे खेळाडू दीर्घकाळ दौऱ्यावर होते आणि जिंकून परतले आहेत. अशा वेळी आम्ही त्यांच्यासाठी खास नाश्ता तयार केला आहे. त्यामध्ये त्यांन आवडणारेअनेक पदार्थ आहेत, ज्याबद्दलते बोलत असतात. उदा- छोले भटुरे. आम्ही मिलेट्सपासून बनवलेले काही खास पदार्थही त्यामध्ये समाविष्ट केले आहेत . एवढंच नव्हे तर आम्ही यासोबतच खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घेऊन आम्ही अनेक पदार्थांचा समावेश केला आहे, असे ITC मौर्यचे एग्झिक्युटिव्ह शेफ शिवनीत पाहोजा यांनी सांगितलं. आम्ही खास त्याच्यासाठी चॉकलेट्सही तयार केली आहेत. चॉकलेटपासून बनवलेल्या अशा अनेक वस्तू असतील त्यांच्या हॉटेलच्या रूममध्ये , ज्या त्यांना आवडतील अशी आम्हाला आशा आहे.

 

टीम इंडियाच्या जर्सीच्या रंगातील खास केक

ITC मौर्या हॉटेलच्या शेफ्सनी वर्ल्ड चॅम्पियन टीमच्या स्वागतासाठी खास केक तयार केला आहे. हा केक टीम इंडियाच्या जर्सीच्या रंगात आहे. त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यावर वर्ल्डकपच्या ट्रॉफीची प्रतिकृती देखील साकारण्यात आली आहे.  शेफ पाहोजा यांनी सांगितले की, हा केक ट्रॉफीसारखा खरा दिसतोय पण तो पूर्णपणे चॉकलेटचा बनलेला आहे. हे आमच्या विश्वविजेत्या संघासाठी आहे. त्यांच्यासाठी आम्ही खास नाश्ताही बनवला आहे.