Video : सय्यद मुश्ताक ट्रॉफीत उमरान मलिकचा कहर, व्हिडीओ व्हायरल करून फलंदाजांना दिला इशारा

| Updated on: Oct 17, 2022 | 10:12 AM

उमरान मलिकने जो व्हिडिओ व्हायरल केला आहे, त्यामध्ये त्यांच्या एका सुरेख चेंडूवरती त्रिफाळा झाला आहे.

Video : सय्यद मुश्ताक ट्रॉफीत उमरान मलिकचा कहर, व्हिडीओ व्हायरल करून फलंदाजांना दिला इशारा
Umran Malik
Follow us on

उमरान मलिक (Umran Malik) या खेळाडूला आंतरराष्ट्रीय सामने (International Cricket) खेळण्याची संधी खूप कमी मिळाली आहे. पण सद्या तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये अधिक चांगली कामगिरी करीत आहे. कारण महाराष्ट्रविरुद्ध (Maharashtra) झालेल्या सामन्यात त्याने महाराष्ट्राच्या टीममधील चार चांगले खेळाडू बाद केले. त्याच्या एका चांगल्या चेंडूवर ज्यावेळी त्रिफाळा उडाला. तो व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

उमरान मलिकने जो व्हिडिओ व्हायरल केला आहे, त्यामध्ये त्यांच्या एका सुरेख चेंडूवरती त्रिफाळा झाला आहे. ही कामगिरी त्याने दोन दिवसापुर्वी महाराष्ट्रविरुद्ध झालेल्या सामन्यात केली आहे.

ऋतुराज गायकवाड़, पवन शाह, दिव्यांग हिंगानेकर आणि शमशुजामा काज़ी यांच्या विकेट त्याने काढल्या, तरीही महाराष्ट्राची टीम सय्यद मुश्ताक ट्रॉफीत यशस्वी झाली.