नवी दिल्ली : विश्वचषक स्पर्धेत (T20 World cup 2022) पाकिस्तान टीमची (Pakistan) कामगिरी चांगली झालेली नाही. त्यामुळे पाकिस्तानचे चाहते खेळाडूंना सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. टीम इंडियाविरुद्धच्या (Team India) रोमांचक मॅचमध्ये पाकिस्तान टीमचा पराभव झाला. त्यानंतर झिम्बाब्वे टीमने पराभव केल्यापासून पाकिस्तानची टीम ट्रोलिंगमध्ये एक नंबरला आहे.
पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझमचा सध्या खराब फॉर्म सुरु आहे. विश्वचषक स्पर्धेत तीन मॅचमध्ये त्याने आत्तापर्यंत फक्त आठ धावा काढल्या आहेत. त्यामुळे त्याच्या कर्णधार पदाबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
ज्यावेळी विराट कोहलीचा खराब काळ चालू होता, त्यावेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने एक ट्विट केलं होतं. तेचं ट्विट कॉपी करुन अमित मिश्राने बाबर आझमला टॅग केलं आहे. त्यामुळे पाकिस्तान टीमचा माजी खेळाडू आफ्रिदी संतापला आहे.
एका वाहिनीला मुलाखत देत असताना, अमित मिश्राबाबत त्याला प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी आफ्रिदी डायरेक्ट म्हणाला की मी त्याला ओळखत नाही. तो फलंदाज होता, की गोलंदाज होता असं म्हणून त्याच अमित मिश्राची खिल्ली उडविली.