मुंबई : T20 विश्वचषक (T20 World Cup 2022) सुरु झाल्यापासून टीम इंडियाचा फलंदाज केएल राहूलला (Kl Rahul) अद्याप चांगली खेळी करता आलेली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) पहिल्या मॅचमध्ये त्याने 4 धावा काढल्या होत्या. तर काल झालेल्या नेदरलॅंडसविरुद्धच्या मॅचमध्ये 9 धावा काढल्या. त्यामुळे चाहत्यांनी त्याच्यावर सोशल मीडियावर टीका करायला सुरुवात केली आहे. त्याचे अनेक मीम्स सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यंदाच्यावर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने चांगली फलंदाजी केली होती.
टीम इंडियाचा दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे याने ईएसपीएनक्रिकइंफोला एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्याने केएल राहूलच्या खराब कामगिरीविषयी वक्तव्य केलं आहे. “ज्यावेळी भारतात आयपीएल सुरु असतं. त्यावेळी आम्ही खेळाडूंना पहिल्या चेंडूपासून तुम्हाला जसं हवं आहे, तसं खेळा असं संदेश देतो. त्यामुळे खेळाडूंची चांगली कामगिरी होतं असते” अनिल कुंबळे यांनी सांगितलं
“केएल राहूल हा चांगला फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत स्वत:ला अनेकदा मैदानावरती चांगली खेळी करुन सिद्ध केलं आहे. मला असं वाटतं आहे की, त्याने पहिल्या चेंडूपासून सेट होऊन तुफान बॅटिंग करावी. तो दबावाखाली खेळत असल्यामुळे त्यांच्या फलंदाजीवर परिणाम झाला आहे.” असं देखील अनिल कुंबळेंनी जाहीरपणे सांगितलं.
विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव सध्या चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहेत. त्यामुळे दोन्ही मॅचमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे दोघांचे चाहते सोशल मीडियावर अधिक खूष असल्याचे पाहायला मिळते.