मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. निवड समितीच्या आजच्या बैठकीनंतर एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 मालिकेसाठी ही घोषणा करण्यात आली. या दौऱ्यामध्ये भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहे. काही नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, तर काही आधीच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली.
या नव्या संघात सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंनाही विश्रांती देण्यात आली आहे. तसेच खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही बाजूला करण्यात आले. या सर्व खेळाडूंच्या जागेवर 8 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यात श्रेयस अय्यर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद, राहुल चहर, दिपक चहर, नवदीप सैनी, हनुमा विहारी अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे.
भारतीय संघ (टी-20 मालिका)
भारतीय संघ (वन-डे मालिका)
भारतीय संघ (कसोटी मालिका)
याआधी ही बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती, मात्र प्रशासकीय समितीने बीसीसीआयच्या सचिवांऐवजी प्रमुखांनी ही बैठक घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे ही बैठक आज (रविवारी) घेण्यात आली. यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. यात श्रेयस अय्यर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद, राहुल चहर, दिपक चहर, नवदीप सैनी, हनुमा विहारी अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे.
धोनीच्या निवृत्तीचा विषय या बैठकीच्या केंद्रभागी असेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्याआधीच धोनीने आपण उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने तो प्रश्नही संपला होता. 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यात 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने होणार आहेत.
पुढील वर्षीच्या ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वचषकाचा विचार करता निवड समितीने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. धोनीच्या जागी युवा खेळाडू रिषभ पंतला जागा देण्यात आली आहे. विश्वचषकातही पंतला शिखर धवनच्या दुखापतीनंतर बोलावण्यात आले होते.