Ind vs Zim 2022 : झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताला आणखी एक धक्का, अष्टपैलू खेळाडूचा दौऱ्या संशयाच्या भोवऱ्यात

| Updated on: Aug 13, 2022 | 9:08 AM

भारत 18, 20 आणि 22 ऑगस्ट रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झिम्बाब्वेमध्ये आयसीसी सुपर लीगचा भाग म्हणून तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.

Ind vs Zim 2022 : झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताला आणखी एक धक्का, अष्टपैलू खेळाडूचा दौऱ्या संशयाच्या भोवऱ्यात
Ind vs Zim 2022 : झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताला आणखी एक धक्का, अष्टपैलू खेळाडूचा दौऱ्या संशयाच्या भोवऱ्यात
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचा (Washington Sundar) झिम्बाब्वे (zimbabwe) दौरा संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कारण त्याला इंग्लंडमधील मँचेस्टर येथे झालेली दुखापत अद्याप बरी झालेली नाही. त्यामुळे तो दौऱ्याला जातोय की नाही याबाबत शंका आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ (Indian Cricket Team) आज सकाळी मुख्य प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मणसह झिम्बाब्वेला रवाना झाला. सुंदर त्याच्या फिटनेसमुळे संशयाच्या भोवऱ्यात आहे. झिम्बाब्वे विरुद्ध भारतीय संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारतीय संघात अनेक नवे खेळाडू आहेत. त्यामुळे होणाऱ्या दौऱ्याकडे सगळ्या क्रिकेट शौकीनांचे लक्ष लागले आहे.

खांद्याला दुखापत झाल्याने संशय

बुधवारी ओल्ड ट्रॅफर्ड येथे लँकेशायर आणि वूस्टरशायर यांच्यातील रॉयल लंडन एकदिवसीय सामन्यादरम्यान मैदानावर क्षेत्ररक्षण करताना सुंदरच्या खांद्याला दुखापत झाली. लँकेशायर काउंटी क्रिकेट क्लबने त्याच्याबद्दल सोशल मीडियावर अपडेट पोस्ट केले होते. त्यामुळे त्याची दुखापत गंभीर असेल तर त्याला सामन्यात खेळता येणार नाही. तसेच त्याची फिटनेस टेस्टवरती देखील संशय व्यक्त करण्यात आला आहे. आत्ता त्याच्या जाग्यावर कोणत्या खेळाडूला संधी मिळणार हे देखील पाहावे लागणार आहे.

संघाला नवा प्रशिक्षक

नॅशनल क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हिव्हिएस लक्ष्मण यांना नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या अनुपस्थितीत संघाचे व्यवस्थापन करण्यास सांगितले आहे. ते नुकतेचं इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि यूएसए या दोन महिन्यांच्या दौऱ्यावरून परतले आहेत. हरारेला गेलेल्या सपोर्ट स्टाफमधील इतर सदस्यांमध्ये साईराज बहुले आणि हृषीकेश कानिटकर यांचा समावेश आहे. केएल राहुल, शिखर धवनच्या नेतृत्वाखाली यापूर्वी जाहीर केलेल्या 15 जणांच्या संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. आशिया चषकापूर्वी फलंदाजाला काही सामने खेळायला मिळतील.

हे सुद्धा वाचा

असा असेल झिम्बाब्वे दौरा

भारत 18, 20 आणि 22 ऑगस्ट रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झिम्बाब्वेमध्ये आयसीसी सुपर लीगचा भाग म्हणून तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. झिम्बाब्वे अलीकडे चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यांनी 10 ऑगस्ट रोजी संपलेल्या एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय दोन्ही घरच्या मालिकेत बांगलादेशचा पराभव केला.