Anushka-Dhoni VIDEO : धोनी बॅटिंगला आल्यावर अनुष्का म्हणाली ते 3 शब्द.. तुम्ही ऐकलेत का ?

| Updated on: Apr 18, 2023 | 10:24 AM

Anushka Sharma-MS Dhoni Video, IPL 2023 : मॅचदरम्यान विराट कोहली खेळत असताना अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावर अनेक हावभाव दिसले. पण RCB vs CSK या मॅचमध्ये जेव्हा महेंद्रसिंग धोनी बॅटिंगसाठी आला तेव्हा अनुष्काचा चेहरा बघण्यासारखा होता.

Anushka-Dhoni VIDEO : धोनी बॅटिंगला आल्यावर अनुष्का म्हणाली ते 3 शब्द.. तुम्ही ऐकलेत का ?
धोनीला पाहून काय म्हणाली अनुष्का ?
Image Credit source: social media
Follow us on

बंगळुरू : 17 एप्रिलच्या संध्याकाळी, जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्जचा (RCB vs CSK) संघ बंगळुरूच्या मैदानावर समोरासमोर आला, तेव्हा त्या सामन्याचे वर्णन आयपीएल 2023 मधील सर्वात मोठा सामना म्हणून करण्यात आले. हा सामना पाहण्यासाठी विराट कोहलीची पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्माही (Anushka Sharma) स्टेडियममध्ये होती. मॅचदरम्यान विराट कोहली (Virat Kohli) खेळत असताना अनुष्का भावना व्यक्त करत होती. पण, जेव्हा एमएस धोनी (MS Dhoni) खेळायला आला, तेव्हाही तिचा उत्साह कमी झालेला दिसत नव्हता.

धोनी बॅटिंगला आल्यावर अनुष्काकडे पाहिलंत का ?

एमएस धोनी फलंदाजीला आला तेव्हा बंगळुरूचे संपूर्ण चिन्नास्वामी स्टेडियममध्ये धोनीच्या नावाचा गजर होता. सर्व प्रेक्षक धोनीच्याच नावाने घोषणा देत होते. मोबाईलचा लाइट लावून सर्वजण धोनीवरचे प्रेम व्यक्त करत होते, ते पाहून अनुष्का शर्माही चकित झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यावेळी अनुष्का शर्माच्या तोंडून फक्त 3 शब्द बाहेर पडले होते, ‘They Loved Him’. अशा शब्दांत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या. म्हणजेच सर्वजण त्याच्यावर (धोनी) किती प्रेम करतात.

पती विराट कोहलीविरुद्धच्या सामन्यात आपल्याच संघाच्या घरच्या मैदानावर एमएस धोनीवर असलेलं प्रेक्षकांचं प्रेम पाहून अनुष्का शर्मालाही आनंद झाला. ती हसताना दिसली.

क्षणात बदलले अनुष्काचे इमोशन !

मात्र, धोनी फलंदाजीला आल्यानंतर दिसलेला अनुष्का शर्माचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण सीएसकेच्या डावाच्या शेवटच्या षटकात दिसणारे अनुष्काचे हास्य क्षणात बदलले. कारण आरसीबीच्या डावाच्या पहिल्याच षटकात जेव्हा विराट कोहली चौथ्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला तेव्हा ती निराश झाली.

 

चेन्नई सुपर किंग्सचा आरसीबीवर 8 धावांनी विजय

आयपीएल च्या 16 व्या मोसमातील 24 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने हायस्कोअरिंग मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 8 धावांनी विजय मिळवला. चेन्नईने आरसीबीसमोर विजयासाठी 227 धावांचे डोंगराएवढं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले होते. कॅप्टन फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांच्या शतकी भागीदारीमुळे सामन्यात रंगत आली होती. मात्र ग्लेन आणि फाफ दोघेही आऊट झाल्यानंतर कोणत्याही फलंदाजाला मॅचविनिंग खेळी साकारण्यात अपयश आलं. आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 218 धावाच करता आल्या.

चेन्नईची बॅटिंग

त्याआधी आरसीबीने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवे याने 83 धावांची खेळी केली. शिवम दुबे याने 27 चेंडूत 52 धावांचं वेगवान अर्धशतक इनिंग साकारली. अजिंक्य रहाणे याने 37 रन्स केल्या. मोईन अली याने नाबाद 19 धावा केल्या. अंबाती रायुडूने 14 आणि रविंद्र जडेजाने 10 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड या सामन्यात अपयशी ठरला. गायकवाड 3 रन्स करुन तंबूत परतला. तर धोनी 1 धावेवर नाबाद राहिला. आरसीबीकडून मोहम्मद सिराज, वेन पार्नेल, विजयकुमार वैशाख, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसरंगा आणि हर्षल पटेल या सर्वांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.