सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) मागच्या काही दिवसांपासून चंढीगडमध्ये युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) वडिलांसोबत ट्रेनिंग घेत आहे. मागच्या दोन दिवसांपुर्वी दोघांचे फोटो सुद्धा व्हायरल झाले होते. त्यावेळी अर्जुनला अनेकांनी कमेंटमध्ये शुभेच्छा सुद्धा दिल्या होत्या. त्याचबरोबर चांगलं ट्रेनिंग घेण्याचा सल्ला सुद्धा दिला होता.
सध्या युवराज सिंगच्या वडिलांसोबत भांगडा डान्स करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. हा डान्स एका जीमच्या रुममधील आहे. कारण त्यांच्यासोबत इतर व्यायाम करणारे सुद्धा दिसत आहेत.
विशेष म्हणजे योगराज सिंग त्या व्हिडीओमध्ये भांगडा कसा करतात हे अर्जुन तेंडूलकरला दाखवत आहेत. ते पाहून अर्जुन तेंडूलकर सुद्धा हसत आहे. त्याचबरोबर योगराज सिंग अर्जुनचा हात हातामध्ये घेऊन डान्स करीत आहेत.
हा व्हिडीओ सोशल मी़डियावर अधिक व्हायरल झाला असून योगीराज यांनी आपल्या कार्यालयीन इन्स्टाग्रामवरती शेअर केला आहे.
युवराज सिंगला खेळाडू म्हणून घडवण्यात योगीराज सिंग यांचा सिंहाचा मोठा वाटा आहे. कारण त्यांनी दिवसरात्र युवराज सिंगची ट्रेनिंग घेऊन त्यांना तयार केले आहे. अर्जुनला सुद्धा तशाच पद्धतीची ट्रेनिंग सुरु आहे.
अर्जुन तेंडूलकरला मागच्या झालेल्या आयपीएल स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.