आज भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांनी आत्तापासून अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला शेवटच्या षटकात धूळ चारली होती. त्यामुळे आज होणारा मुकाबला अटीतटीचा होण्याची शक्यता अधिक आहे. भारताचा अष्टपैलू फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे त्रस्त आहे, तर पाकिस्तानचा तेज गोलंदाज शाहनवाज दहानी देखील मागच्या सामन्यात जखमी झाला आहे. त्यामुळे दोन्ही संघातील दोन्ही खेळाडू नसल्याने त्यांच्या जागी आज कोणत्या खेळाडूची वर्णी लागणार हे सुद्धा पाहावे लागेल.
मागच्या झालेल्या सामन्यात हार्दीक पांड्याने भारतीय क्रिकेट शौकीनांची मने जिंकली. शेवटच्या षटकात मॅच आलेली असताना, नेमकं काय होईल याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. परंतु पांड्याने त्याच्या शैलीने चेंडू सीमारेषेच्या पार ढकलला. त्यानंतर मैदानात क्रिकेट चाहत्यांचा मोठा उत्साह मैदानात पाहायला मिळाला. आयपीएलमध्ये सुद्धा पांड्याने गेल्यावर्षी चांगली खेळी केली होती. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
फलंदाजी आणि अचूक गोलंदाजी करीत असल्याने हार्दीक पांड्याची अनेकजण स्तुती करीत आहेत. पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज वसिम अक्रम याने सुद्धा हार्दीक पांड्याचा खेळ मला आवडत असल्याचे म्हटले आहे. तसेच सध्या तो माझा फेवरेट खेळाडू आहे असंही अक्रमने जाहीर केलं आहे. त्याचबरोबर वसिम अक्रम याने पाकिस्तानी खेळाडूंना देखील शुभेच्छा दिल्या आहेत. पाकिस्तानी खेळाडूंनी भारतीय खेळाडूंसारखा खेळ करावा असंही असं म्हटलं आहे.