काल भारताचा (India) श्रीलंकेकडून (Shrilanka) पराभव झाल्यानंतर भारताला एक औपचारिक सामना खेळावा लागणार आहे. कारण भारत या स्पर्धेतून पडल्याचे निश्चित मानले जात आहे. पण आज आजच्या सामन्यात अफगाणिस्तानकडून पाकिस्तान हारला तर भारताला अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी एक संधी आहे. काल दुबईत झालेल्या मॅचमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केल्यामुळे त्यांचा विजय झाला. विशेष म्हणजे पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषकाचा (Asia Cup 2022)अंतिम सामना होऊ शकतो अशी सोशल मीडियावर कालपासून चर्चा आहे.
आशिया चषकात सुपर चारमध्ये काल भारतीय संघाचा सलग दुसरा पराभव झाला. काल झालेल्या सामन्यात रोहित शर्माने तुफान फलंदाजी केली. परंतु त्याला अन्य खेळाडूंनी चांगली साथ दिली नाही. रोहित शर्मा खेळत असताना धावसंख्येत गती होती. परंतु शर्मा बाद झाल्यानंतर धावसंख्या त्या गतीने ठेवण्यात इतर खेळाडूंना अपयश आले.
आज सामन्याकडे सगळ्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. कारण आजच्या सामन्यात भारताचा संघ आशिया चषकात राहणार की नाही हे ठरेल. समजा आज पाकिस्तानचा पराभव झाला तर, भारताचा पुढची मॅच अफगाणिस्तानसोबत होणार आहे. ती मॅच भारतीय संघाने जिंकल्यानंतर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचेल.