आशिया चषक (Asia Cup 2022) सुरु झाल्यापासून खेळाडूंमधील (Player) अनेक घडामोडी बाहेर आल्या आहेत. आशिया चषकात खेळाडूंचा झालेला संघर्ष वारंवार समोर आला आहे. त्यामुळे त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भारत पाकिस्तान सामना सुरु असताना सुद्धा दोन्ही खेळाडूंमध्ये अनेकदा संघर्ष झाला आहे. आशिया चषकातील सुपर चार मधील पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना सुरु असताना आसिफ अली आणि फरीद अहमद यांच्यात जोरदार वादावादी झाली. यानंतर आसिफ अली (Asif Ali) यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी अफगाण क्रिकेट बोर्डाने केली होती.
Asif Ali and Fareed Ahmad charged with breaching the ICC Code of Conduct.
हे सुद्धा वाचाDetails ? https://t.co/20XEWzHhQt
— ICC (@ICC) September 8, 2022
मॅच रोमाचंक सुरु असताना कोण जिंकेल अशी उत्सुकता ताणली होती. त्यावेळी पाकिस्तानच्या विकेट पडायला लागल्याने, मैदानात अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी उत्साह सुरु केला होता. त्याचवेळेस फरीद अहमद याने आसिफ अलीची विकेट घेतली. फरीद अहमद याने असिफ अलीला पाहून जोरदार आनंद साजरा केला. त्यावेळी असिफ अलीने फरीद अहमदच्या अंगावर बॅट घेऊन धावला.
اس اینگل کی وڈیو بھی دیکھیں، نہیں معلوم ان افغان بھائیوں کو اتنی نفرت کیوں ہے؟#AFGvPAK pic.twitter.com/2aI6jUZUFN
— Nadir Baloch (@BalochNadir5) September 7, 2022
ज्यावेळी हे प्रकरण मैदानात घडतं होतं, त्यावेळी इतर खेळाडूंनी तात्काळ मध्यस्थी केल्याने हे प्रकरण मिटलं. परंतु त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्यामुळे असीफ अलीवर जोरदार टीका झाली. त्यानंतर आयसीसीने या दोघांना मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावला आहे.
झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या चाहत्यांना अफगाण चाहत्यांनी मारहाण सुद्धा केली आहे. त्याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे.