काल दुबईत (Dubai) झालेल्या भारत आणि श्रीलंका (IND VS SL) सामन्यात भारताचा पराभव झाला. परंतु भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) चांगली खेळी केली. त्याने केलेल्या 72 धावांमुळे भारतीय संघाला 173 धावापर्यंत मजल मारता आली. काल रोहित शर्माने चांगली फलंदाजी केल्यामुळे क्रिकेट चाहते आनंदात होते. परंतु काल झालेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
#RohitSharma Keep your eyes on the ball when Hitman is in such form#INDvsSL pic.twitter.com/8J7UXgywVc
हे सुद्धा वाचा— Cricket fan (@Cricket58214082) September 6, 2022
रोहित शर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. 41 चेंडून त्याने 72 धावा केल्या. त्यामध्ये 5 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. रोहित शर्माने काल तीन षटकार लेग साईडला मारले. त्यापैकी एक षटकार थेट सुरक्षा रक्षकाच्या पाठीवर पडला. काल मारलेल्या चार षटकारांपैकी तो उत्तुंग षटकार होता.
सुरक्षा रक्षकाच्या पाठीवर लागलेल्या चेंडूचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. तसेच रोहित शर्माचं त्याच्या चाहत्यांकडून अधिक कौतुक केलं आहे. सोशल मीडिया फिरत असलेल्या व्हिडीओला वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट आल्या आहेत.
आज अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. समजा आजच्या मॅचमध्ये पाकिस्तानं हरलं, तर भारताला एक संधी मिळू शकते, अन्यथा भारतीय संघाला एक अनौपचारिक सामना खेळावा लागणार आहे.